तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 April 2019

मालेवाडी- वनवासवाडी रस्त्याचे काम मुदतीनंतरही अपुर्णच रस्त्याचे उर्वरित काम त्वरीत पुर्ण करावे-वसंत मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
    मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मालेवाडी-वनवासवाडी-हेळम रस्त्याच्या कामांची मुदत  संपुन वर्ष होत आहे. तरीही हे काम अद्याप पुर्ण झालेले नसुन जे काम करण्यात आले आहे. ते काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. यामुळे या भागातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.  या कामावर 4 कोटी 49 लाख 92 हजार रुपये अंदाजे खर्च करण्यात येत आहेत. परंतु हा खर्च पाण्यात जात असुन सदरील कंत्राटदाराने हे काम त्वरीत पुर्ण करावे अशी मागणी काँग्रेस ओबीसी सेलचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांनी केली आहे. 
    महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मालेवाडी-वनवासवाडी-हेळंम रस्त्याचे 26/05/2017 रोजी सुरु करण्यात आले आहे. हे काम 26/05/2018 रोजी पुर्ण करावयाचे होते. परंतु पुलाचे काम रखडल्याने हे काम मुदतीत होऊ शकले नाही व डांबर नसल्याने कारपेटचे काम रखडले आहे. सध्या  या रस्त्याचे काम 80 टक्के पुर्ण झाले आहे.  परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असुन अंदाज पत्रकात नमुद केल्या प्रमाणे केलेले नाही.  या रस्त्यावरुन मालेवाडी, वनवासवाडी, हेळंम, हाळम, धर्मापुरी आदी गावांसाठी वाहतुक होते. परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे ही वाहतुकही सध्या बंद आहे. या रस्त्यावर केवळ मोठी खडी टाकुन बीबीएम करुन पहिला थर देण्यात आला आहे. यानंतर मागील दीड वर्षापासुन उर्वरित काम झालेलेच नाही. या रस्ता कामाकडे  कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामिण रस्ता विकास संस्था बीड यांचे दुर्लक्ष होत असुन सदरील रस्त्याचे काम त्वरीत पुर्ण करावे अशी मागणी काँग्रेस ओबीसी सेलचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांनी केली आहे.

No comments:

Post a comment