तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

मंगरुळपीर तालुक्यातील पिपंळखुटा संगम येथे भाविकांची मांदियाळीश्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद
फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)
मंगरुळपीर :  तालुक्यातील तिर्थक्षेञ म्हणून पंचक्रोशीत नावलौकीक असलेल्या पिंपळखुटा संगम येथे राम कृष्ण विठ्ठल हरी नारायण... व गोविंदा, गोविंदा.. चा गाजर करीत पंचक्रोशीतील भाविक भक्त संतनगरी पिंपळखुटा संगम  येथे   भायजी  महाराज्यांच्या चरणावर शनिवार १३ एप्रिल रोजी नतमस्तक झाले.  रामनवमी उत्सवानिमीत्त पिंपळखुटा संगम येथे भव्य शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा जवळपास ७५ हजारांवर भाविक भक्तांनी लाभ घेतला.

संत भायजी महाराज तीर्थक्षेत्र पिंपळखुटा संगम येथे रामनवमीनिमित्त 128 व्या  यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत साजर्‍या होणार्‍या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी यामध्ये रविवार ७  ते  शनिवार १३ एप्रिल सकाळी ६ वाजेपर्यंत ‘राम कृष्ण विठ्ठल हरी नारायण’ नामाचा अखंड जयघोष करण्यात आला.
शनिवार १३ एप्रिल  रोजी सकाळी  ६ वाजता काकड आरती सकाळी ७ वाजता गोविंदा गोविंदा .. चा गजर करीत भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. सकाळी ८ वाजता मृती व समाधी पूजन, सकाळी ९ वाजता संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ चांभई यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. दुपारी १२ वाजता राम तर्‍हाळकर  यांच्या सुमधूर वाणीतून श्रीराम जन्म कथा प्रवचन, दुपारी २ वाजता राम तर्‍हाळकर अकोला यांच्याहस्ते  श्रीराम, लक्ष्मण व सिता मूर्ती पुजन व दुपारी ३ वाजता गोविंद महाराज प्रदक्षिणा व दहीहांडी कार्यक्रम झाला. 
दुपारी ५ वाजतापासून ह.भ.प. प्रकाश महाराज गावंडे पिंपळखुटा, वैराग्यमूर्ती आकाशपुरी महाराज व ह.भ.प. संजय महाराज जाधव अकोला यांच्या उपस्थितीत भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आहे. या यात्रा महोत्सवात सर्व प्रथम महिलांना महाप्रसाद वितरीत करण्यात आला.  रात्री उशीरापर्यंत महाप्रसादाचे वितरण सुरू होते. महाप्रसाद व इतर व्यवस्थेकरिता अनेकांनी सहकार्य केले. आ. लखन मलिक यांनी दुपारदरम्यान यात्रा उत्सवाला भेट देऊन संत भायजी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी संत भायजी महाराज तीर्थक्षेत्र विकासाकरिता १० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली.

आजपासून भायजी महाराज ग्रंथ पारायण
रविवार १४  ते गुरुवार १८ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ५ ते ६ वाजे पर्यंत ह.भ.प. पुंडलीक महाराज गावंडे व ह.भ.प. लक्ष्मण महाराज फुके  यांच्या मार्गदर्शनाखाली काकड आरती,  दुपारी २ ते ५   ह.भ.प.प्रकाश महाराज यांच्या मार्गदर्शनात संत भायजी महाराज ग्रंथ पारायण व संध्याकाळी ६ ते ७ हरीपाठ  होणार आहे. गुरुवार १८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ह.भ.प. भानुदास महाराज पिंपळखुटा यांचे हरिकिर्तन होणार असून, शुक्रवार १९  एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त सकाळी ६ वाजता मिरवणूक, सकाळी ९ वाजता ह.भ.प. प्रकाश महाराज यांचे काल्याचे कीर्तन व सकाळी ११ वाजता महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.  तरी या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांंनी घ्यावा, असे आवाहन गावकरी मंडळी व यात्रा उत्सव समितीने केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment