तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 April 2019

दादाहरी वडगाव येथे ना.पंकजाताई मुंडे यांची जाहिर सभा सभेस उपस्थित राहुन खा.डॉ.प्रितमताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब करावे-राजेश गित्ते


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
    बीड लोकसभेच्या भाजपा- शिवसेना- रिपाई - रासप-रयत क्रांती सेनेच्या उमेदवार खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची आज सोमवार दि.१५ एप्रिल २०१९ रोजी दादाहरी वडगाव येथे रात्रौ ७ वा.जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेस भाजपाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असुन या सभेस नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दबंग खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करावे असे आवाहन भाजपाचे युवानेते राजेश गित्ते यांनी केले आहे. 
बीड जिल्ह्याच्या दबंग खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात कुठलाही भेदभाव न करता केंद्र सरकारचा विकास निधी खेचून आणला परळीत त्यांनी आपल्या फंडातुन अनेक रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला. तसेच त्यांच्या पर्यत्नाने परळी तालुक्यातुन चार राष्ट्रीय महामार्ग, परळी बायपास असे अनेक रस्ते होत आहेत. गावामध्ये अनेक ठिकाणी सभागृह उभे आहेत. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना जिल्हाभरातुन प्रचंड पाठिंबा मिळत आहे. आपल्या परळी तालुक्यातुन पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवार दि.१५  एप्रिल रोजी दादाहरी वडगाव येथे रात्रौ ७ वाजता होत असलेल्या राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या जाहिर सभेस उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे युवानेते राजेश गित्ते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment