तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 17 April 2019

भाजपाचे माणिक सातभाई यांचा विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादीत प्रवेश
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- भाजपाचे किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष माणिक सातभाई यांनी आज परळीतील मोंढा मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या प्रचाराच्या समारोप सभेत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहिर प्रवेश केला.
परळी तालुक्यातील तडोळी येथील माणिक सातभाई त्यांचा ग्रामिण भागात दांडगा जनसंपर्क असुन   भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणुन त्यांनी ओळख आहे. त्यांच्याकडे भाजपा किसान आघाडीच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी होती. परंतु पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडुन एकाधिकारशाही होत असुन  सर्व सामान्य भाजपा कार्यकर्त्यांचे कसलेच काम होत  नाही. तसेच त्यांच्याकडुन कार्यकर्त्यांवर सातत्याने आरेरावी केली जाते. पालकमंत्र्यांच्या या कारभाराला कंटाळुन सातभाई यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. माणिक सातभाई राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहिर प्रवेश करताच राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीच्या  परळी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सक्रियपणे काम करुन पक्षसंघटना मजबुत करुन त्या माध्यमातुन जनसेवेची कामे करावेत. माणिक सातभाई हे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असुन लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत त्यांनी भाजपाचे काम केले आहे. परंतु त्यांच्या पश्‍चात भाजपात कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे सातभाई यांनी सांगितले. यावेळी  विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे, न.प.चे गटनेते वाल्मिक कराड, जि.प.सदस्य अजय मुंडे, रा.यु.काँ.प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे,   माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुर्यभान मुंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ आदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहिर प्रवेश केला.

No comments:

Post a Comment