तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 April 2019

मतदार जागृती अभियान व पाणपोईचे गेवराईत उद्घाटनसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १२ __ येथील कॅप्टन कृष्णकांत प्रतिष्ठान तसेच श्री चिंतेश्वर शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती अभियान सेल्फी पाँँइंट, तसेच पाणपोईचे उद्घाटन कॅप्टन कृष्णकांत हायवे सर्व्हिसेस (पेट्रोल पंप) गेवराई येथे संपन्न झाले. 
     या कार्यक्रमाची सुरुवात भारत माता प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी अध्यक्ष म्हणून श्रीमती ललिताताई चंद्रकांत कुलकर्णी, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सरकार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, चिंतेश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह डॉ. नितीन डोळे, डॉ. शाम झंवर, रा. स्व. संघाचे विस्तारक विकासजी रेंगे, गणेश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते गणेश मोटे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. हेमंत वैद्य म्हणाले की, कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली. आपल्याला व देशासाठी आपले अधिकार, हक्क प्राप्त करून दिली आहेत, तो मतदानाचा हक्क आपण देशासाठी बजावायचा आहे. 
        या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप गणेश कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक श्रीमती सुषमा मोरगावकर ,पद्य गायन गोले सर करून शेवटी आभार ठोंबरे सर, आणि सुत्रसंचालन घोलप सर यांनी मानले. यावेळी श्री. चिंतेश्वर शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यानंतर सर्वांना अल्पोपहाराने सांगता झाली.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment