तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

तेल्हारा नगराध्यक्ष यांना पाण्यासाठी नागरिकांनी घातला घेराव
·     नागरिकांनी धरले न प प्रशासनाला धारेवर

·     लहान बालकांना सुद्धा भटकावे लागते पाण्यासाठी

तेल्हारा :         तेल्हारा नगर पालिका अध्यक्षा ह्या वेळेस थेट जनतेतुन निवडून आल्याने नागरिकांनी काल सकाळी थेट पाण्यासाठी नगराध्यक्षा यांना घेराव घालून पाणी कधी मिळणार अशा प्रश्नांचा भडिमार करून धारेवर धरले होते.

            शहरातील प्रभाग क्र ६ मध्ये पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असतांना नगर पालिका प्रशासन व् पदाधिकारी हे लोकसभा निवडणुकिच्या धामधुमित मग्न आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रभाग क्र ६ मधील जिजामाता नगर, तुद्गाव रोड वरील रहिवाशांना पाण्यासाठी जिवाचे रान करावे लागत असून वारंवार तक्रारी करून सुद्धा पाण्याचा प्रश्न नगर पालिका प्रशासन सोडवू शकले नाही हे निंदनीय आहे. नागरिकांना सर्व  कामे सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लगते नंतर संसार चालवीन्यासाठी मोलमजुरी करावी लागते.

            जनतेमधून नगराध्यक्षा निवडून दिल्यामुले येथील नागरिकांनी चक्क नगराध्यक्षा यांना बोलावून पाण्यासंदर्भात आपबीती सांगुन विनवणी केलि असता. नाग्रिध्य्क्षांच्या वक्ताव्यामुले नागरिकांचा पारा चढून त्यांनी नगराध्यक्षा  नगर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. गेल्या काही महिन्यांपासून तेल्हारा शहराच्या विकासबाबत आश्वासंनाची खैरात घालणा-या नगराध्यक्षा यांना नागरिकांनी धारेवर धरून मनातील भड़क काढल्याचे दिसून येत होते.

No comments:

Post a Comment