तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

गंगाखेड नगरीत राजेश विट्टेकरांची प्रचंड प्रचार रँली....

आरूणा शर्मा
 पालम

संत जनाई नगरी मध्ये परभणी लोकसभा राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विट्टेकर यांचा प्रचार रँलीस व्यापारी बांधवासह मतदारानी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला.काँग्रेस,राष्ट्रवादी, घनदाट मामा मिञ मंडळ, शेकाप. रिपाई गवई गटाचे उमेदवार राजेश विट्टेकर यांचा प्रचारार्थ आज गंगाखेड शहरात रँलीचे आयोजन करण्यात आले. होते संत जनाबाई यांचा मंदीरा पासुन निघालेल्या प्रचार रँलीत आ.डॉ.मधुसुधन केंद्रे,नगराध्यक्ष विजयकुमार तापडीया,अँड संतोष मुंडे,बाळकाका चौधरी,भरत दादा घनदाट,मिथिलेश केंद्रे,भाई लक्ष्मणराव गोळेगावकर,गोविदराव यादव,साहेबराव भोसले,सुनील चौधरी, प्रा.शिवाजी दळणर, अॅड.जयत अंबेकर, माधव भोसले,अँड अकबर,बालाजी शेटे,कैलास दिडशेरे,बाबुराव गळाकाटू ,वसंतराव सिरस्कर,गुलाबराव सिरस्कर,कादरभाई गुळ्खंडकर,विजयकुमार शिदे,प्रमोद मस्के,सह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.संत जनाईचा दर्शनाने प्रचार रँलीचा शुभारंभ करण्यात आला.जागोजाग मतदारानी राजेश विट्टेकर यांचे जंगी स्वागत केले.मुख्य बाजार पेठेतील व्यापारी यांना देण्यात आलेल्या भेटी मध्ये राजेश विट्टेकरांना अभूतपूर्व प्रतिसाद व्यापाऱ्यांनी दिला.बाजारपेठ मार्ग डॉ.आंबेडकर चौकात राष्ट्रवादीचे उमेदवार विट्टेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करते वेळी म्हणालेकी मागील तीस वर्षात जिल्हाचा औद्योगिक विकास झाला नसल्याने जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.वाळू उपसामुळे दक्षिण गंगा गोदावरी आज कोरडी पडल्याने पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे.जिल्ह्याचा सर्वागिण विकासासाठी आपण  कटीबद्ध आसून परीवर्तन करणे गरजेचे आहे.यावेळी अनेकानी आपले मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment