तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

ऑल इंडिया कुस्ती उपविजेता प्रशांतचा अट्टल कॉलेजात सन्मान


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १० ( प्रतिनिधी ) हरियाणा राज्यात झालेल्या ऑल इंडिया आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धैत येथील आर बी अट्टल महाविद्यालयाचा पैलवान प्रशांत शांताराम सूर्यवंशी याने खुल्या गटात अंतिम फेरीत उपविजेतेपद पटकावले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुस्ती संघातून हरियाणा येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेतून आर बी अट्टल महाविद्यालयाचा पैलवान प्रशांत सूर्यवंशी याने खुल्या गटातून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फेरीत कुस्तीगीरांना चितपट करीत अंतिम फेरीत उपविजेतेपद पटकावले.
        पैलवान प्रशांत आर बी अट्टल महाविद्यालयात बी ए द्वितीय वर्षात शिकत आहे. त्यास विद्यापीठाचे कोच प्रा. विधाते, क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. सचिन पगारे, प्रा. राजेंद्र बरकसे, प्रा. रविंद्र खरात यांचे मार्गदर्शन लाभले होते. या शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास तो महाविद्यालयात हजर राहू शकला नव्हता. नुकताच दि .९ रोजी तो महाविद्यालयात कामानिमित्त आला असता प्रशांतचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते ट्रॅकसूट देऊन शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी उपप्राचार्या डॉ. रजनीताई शिखरे, उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, प्रबंधक बी .बी. पिंपळे, प्रा. राजेंद्र बरकसे , प्रा. रविंद्र खरात, प्रा. डॉ. विजयकुमार बांदल, प्रा.डॉ. प्रशांत पांगरीकर, सुदर्शन निकम, अमर गावडे, सुरेश मोटे, कैलास मस्के यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment