तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 17 April 2019

ग्रामिण भागाच्या सर्वांगिण विकासाला मतदारांची साथ खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा-राजेश गित्ते
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
बीड लेाकसभे मतदार संघातील भाजपा-शिवसेना-रासपा-रिपाई महायुतीच्या उमेदवार खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मागील पाच वर्षाच्या काळात बीड विशेषता परळी तालुक्याला विकासाच्या नव्या उंचीवर आणुन ठेवले असुन त्यांच्या विकास कार्यामुळेच ग्रामिण भागातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी असुन मागील निवडणुकी पेक्षा या निवडणुकीत अधिक मताधिक्य घेऊन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना विजयी करा असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेश गित्ते यांनी केले आहे. 
लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली निधनानंतर बीड जिल्हयात निर्माण झालेली विकासाची पोकळी भरुन काढण्यासाठी राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री ना.पंकजताई मुंडे या सातत्याने प्रयत्न करीत आहेत.  केंद्र सरकारच्या माध्यमातून मुंडे साहेबांनी पाहिलेले बीड जिल्ह्याच्या रेल्वेचे स्वप्न ना.पंकजाताई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितमताईंनी पुर्णत्वास नेले आहे. 3 हजार कोटी रूपयांचा हा  प्रकल्प पुर्णत्वास जात आहे.बीड जिल्ह्याच्या वेशित आज रेल्वे आली आहे. देश विदेशात जाण्यासाठी  व्यापारी, शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी  आणि नागरीकांना पुण्या - मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन पासपोर्ट काढावा लागत होता, बीड सारख्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय त्यांनी उभे केले. त्यामुळे आर्थिक बचत होण्यासोबतच वेळेचीही बचत नागरीकांची झाली आहे. महिलांच्या आरोग्याचा प्रश्‍न असेल अथवा तरूणांच्या रोजगाराचा प्रश्‍न असेल यासाठी सातत्याने संसदेत त्यांनी प्रश्‍न उपस्थित  केले. आज मुद्रा योजनेच्या माध्यमातून छोट्या छोट्या व्यवसायीकांना विनासायास लाखो रूपयांचे कर्ज उपलब्ध झाले आहे. ना.पंकजाताई आणि खा.प्रितमताई मुंडे यांनी केलेला बीड जिल्ह्याचा विकास हा सर्व सामान्य जनतेच्या डोळ्यासमोर असतांना विरोधकांना मात्र हा विकास दिसत नाही. जातीपातीचे विष पेरून विरोधक जनतेची दिशाभुल करण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत. परंतु ज्या लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पाठीशी बीड जिल्ह्याची जनता सदैव उभी राहिली तीच जनता या संघर्ष कन्यांच्या पाठीशी खंबीरपणे  उभी आहे.
तर केंद्र सरकारमधील अनेक योजना प्रभावी पणे राबविण्यासाठी आणि राष्ट्रीय महामर्गा, पासपोर्ट सेवा, आरोग्य व स्वच्छता, शिक्षण, शेतकर्‍यांच्या विविध योजना, जिल्हा वार्षीक योजना अशा अनेक योजनांमधुन विकासाची खरी दिशा प्राप्त करुन देणार्‍या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्फतच येणार्‍या काळात परळी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलु शकतो. खा.डॉ.प्रितमताईंच्या विकास परवाला आता सुरुवात झाली असुन ग्रामिण भागातील जनतेने ही निवडणुक हातात घेतली आहे. दादाहारी वडगाव जि.प.सर्कल मधील सर्वच गावांमधील कार्यकर्ते व सर्व सामान्य नागरिक प्रितमताईंना पुन्हा नव्या विश्‍व विक्रमांने विजयी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. याभागातुन मताधिक्य मिळवुन देण्यासाठी कार्यकर्ते व मतदारांनी आज दि.18 एप्रिल रोजी सकाळी 7 ते  संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या वेळेत उत्सफुर्तपणे मतदान करुन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना विजयी करा असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेश गित्ते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment