तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

किनगाव शिवारातील शेतकऱ्यांचा ऊस व मोसंबीचा बाग जळून खाक
सुभाष मुळे..
---------------
गेवराई -दि. १३ ( प्रतिनिधी ) एकीकडे दुष्काळाचे चटके मोठ्या प्रमाणावर बसत असून शासनाकडून कोणतीही मदत नाही, अशा अवस्थेत ऊस व  मोसंबीच्या वाढीस लागलेला ऊसास आग लागून २ एकर ऊस आणि शेजारी असलेल्या मोसंबी पिकाचे जळून लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील किनगाव शिवारात घडली आहे.
      याबाबतची माहिती अशी की, ११ एप्रिल २०१९ रोजी दुपारी २ च्या सुमारास किनगाव शिवारातील गट नं. १५ मधील श्रीकांत दादाराव चाळक यांचा नवीनच फुटलेला ऊस शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाला. त्याच्या शेजारी असलेल्या रामेश्वर नवनाथराव चाळक यांच्या मळ्यातील मोसंबीची ६० झाडे जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शेतकरी राम चाळक यांनी तलाठी पांढरे यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. अद्याप स्थळी पंचनामा झालेला नव्हता. येथील शेतकरी दि. १२ रोजी तहसीलदार गेवराई यांना निवेदन देण्यासाठी गेले असता ते निवडणूक कामात असल्याचे समजले. या दुष्काळात शेतकऱ्यांचे शॉर्टसर्किट झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मोसंबी उत्पादन शेतकरी रामेश्वर नवनाथराव चाळक यांनी केली आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment