तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 April 2019

विनायक मेटेंना पुन्हा हादरा ; शिवसंग्रामचे बालाजी पवार, किशोर कांकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपात


ना. पंकजाताई मुंडे यांना दिला पाठिंबा, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना निवडून आणण्याचा केला निर्धार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १४ --------आ. विनायक मेटे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून शिवसंग्रामचे खंदे कार्यकर्ते बालाजी पवार आणि किशोर कांकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसंग्रामला सोडचिठ्ठी देत आज भाजपात प्रवेश केला आहे. कार्यकर्त्यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना पाठिंबा देत भाजपा महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व कार्यकर्त्यांचे ना. पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले.

     आ. मेटे सध्या मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वागत आहेत. कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते कंटाळून गेले आहेत. मेटेंच्या वागणुकीला कंटाळलेल्या कार्यकर्ते पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करीत आहेत. आज रविवारी शिवसंग्रामचे खंदे समर्थक बालाजी पवार, किशोर कांकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष लाला पाटील चौरे (खंडाळा), अॅड. दीपक गायकवाड (जेबा पिंपरी), बबनराव कोकाटे (मांजरसुंबा), पिंपळगाव घाटचे माजी सरपंच रमाकांत तेलंग, राजाभाऊ कारगुडे (पाली) आदी कार्यकर्त्यांनी आज यशश्री निवासस्थानी भाजपात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत करून सन्मानाची वागणूक देण्याची ग्वाही दिली.
      दरम्यान जिल्ह्याला अभ्यासू आणि जनतेच्या विकासाची तळमळ असणाऱ्या खासदाराची आवश्यकता असुन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सतत जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला असल्याने या निवडणुकीत त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

भटके विमुक्त संघटनेचा पाठिंबा
---------------------------
दरम्यान खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रामाणिक काम केले आहे. त्यामुळे भटके विमुक्त संघटनेने त्यांना पाठिंबा देऊन त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. संघटनेचे शंकरराव विटकर, गंगाधर निर्मळ, राजाभाऊ कारगुडे आदींनी आज यशश्री निवासस्थानी पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन आपले पाठिंबा पत्र सादर केले. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे भटके विमुक्त संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment