तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी बजरंग सोनवणे यांना निवडू द्या-वसंत मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- केंद्र व राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या काळात सर्वसामान्य जनता शेतकरी, कष्टकरी, शेतमजुर सर्वांची घोर फसवणूक केली आहे.  त्यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर हे 
सरकारला सत्तेवरुन खाली खेचले पाहिजे, तसेच भारतीय लोकशाही संपवू पहाणाऱ्या भाजपाचा पराभव करण्यासाठी त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षाने एकत्र येवून बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना उभे केले आहे. त्यांच्या विजयासाठी आपण आपलं लाख मोलाच मत घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करुन भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा नवनिर्वाचित श्रम व रोजगार विभागाचे चेअरमन वसंत मुंडे यांनी केले आहे.

       याबाबत दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हणटले आहे की, काँग्रेसचे योगदान देश कधीच विसरणार नाही. सद्यस्थितीत भाजपा सरकाराची हुकूमशाही राजवटीला सर्वसामान्‍य जनता कंटाळली असून देशात काँग्रेसचे सरकार येणार आहे. तसेच या सरकारने गँसदर वाढविला, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले, रेल्वे टिकीट, प्लँटफार्मचे टिकटे वाढविली, राम मंदिरचे काय झाले. 370 कलम रद्दच का झाली नाही, समान नागरी कायदा लागू केली का ?, दलित, मुस्लिम, आदिवासी, कामगार, शेतकरी यांच्या वर हल्ले, नँचरल इंन्शुरन्स कंपनी भारत सरकारचे काम बजाज आदानी अंबानी आ
ओरीयन्टल, टाटा कंपनी, रिलायन्स इन्शुरन्स कंपनी कामे देऊन अधिकारी व कर्मचारी यांनी पिक विमा भ्रष्टाचार केला आहे. अंतकी हल्ले कमी झाले नाही तर वाढले,  शहीद जवान व नागरिकांवर हल्ले वाढले. नोटबंदी व जीएसटी चा चुकीचा निर्णय घेतल्यामुळे देशाचे आथिर्ककरण ढासळले, राफेल घोटाळा, रेल्वेला डिझेल पुरविण्याचे काम, देशातील पाच विमानतळाचे देखरेख व्यवस्थापन, बीएसएनएल मोडकळीस आणले, जिओला प्राधान्य  कामसरकारच्या विद्युत निर्मिती बंद करून खाजगी कंपनी ला दिले. हे सगळे उद्योग अनिल अंबानीच्या घशात घातले. दुष्काळाच्या झळा तीव्र असतांना उपाययोजना करण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले आहे. बीड जिल्ह्यातील स्थानिक मुद्दे जलयुक्त शिवार, पीक विमा, मुख्यमंत्री सडक योजना व राष्ट्रीय महामार्ग, पाणीपुरवठा योजना बंद, परळी तालुक्यातील संगम 18 खेडी योजना, चारा छावण्या, टँकर, रोजगार हमी योजनेचे कामे नाहीत. बीड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.  जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा , लोकांच्या मजुरीचा प्रश्न भेडसावत आहे. रस्त्याची प्रचंड दुर्दरशा झालेली आहे. सामान्य जनतेच्या समस्या भेडसावत आहेत. बीड जिल्ह्यात एकही प्रकल्प केंद्र किंवा राज्य सरकारचा आणलेला नाही. परळी ते अंबाजोगाई रस्त्याची दोन वर्षापासून झालेली दुर्दशा केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. या सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेवर अन्याया झाला आहे. तरुणांना रोजगार नाही, गौर गरीब शासनाचा फायदा नाही आदींचा उहापोह करत फसवी कर्जमाफी करुन शेतकर्‍यांच्या जखमेवर सरकारने मीठ चोळले आहे. या सरकारी मधील निम्मे मंत्री आलीबाबा चालीस चोर आहेत.  सरकारमधील असणार्‍या मंत्र्यांना सर्वसामान्य जनता आणि शेतकर्‍याचे काहीही देणेघेणे नाही त्यामुळे प्रश्नांचा गुंता गेल्या पाच वर्षात वाढतच गेलेला आहे. विकासाच्या नुसत्या गप्पा मारणार्‍या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. आघाडीचे लोकसभेचे उमेदवार  बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सामान्य जनता उतरली असल्याने विरोधकांची झोप उडाली आहे. शेतकर्‍याच्या पोराला खासदार करण्यासाठी सर्व समाजातील, तळागाळातील कार्यकर्ते, नेतेमंडळी सक्रिय सहभागी झाल्याने आता त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी व मित्रपक्ष आघाडीच्या नेतेमंडळींनी बैठका, कॉर्नर सभा, मतदारांशी संवाद, पदयात्रा, प्रचार रॅली या सार्‍या प्रचाराच्या पद्धतीने सर्वत्र घड्याळाचा गजर घुमू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षच सर्वसामान्य जनतेची काळजी घेणारे पक्ष आहेत त्यामुळे या महाआघाडीचे 
शेतकरीपुत्र बजरंग बप्पा सोनवणे यांना मतदानरूपी आशिर्वाद देऊन लोकसभेत पाठविण्यासाठी बहुमतांनी मतांनी विजयी करुन न्याय देणारे सरकार आपल्याला दिल्लीच्या तख्तावर बसवायचे आहे. देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी आपले अमुल्य मत बजरंग सोनवणे यांन घडयाळ या चिन्हाला देवून बीड जिल्ह्यात इतिहास घडवावा. बजरंग सोनवणे यांना जिल्ह्यातून जास्तीत जास्त लिड मिळूण देण्यासाठी एकजुटीने सर्व काँग्रेसचे पदाधिकारी खांद्याला खांदा लावून बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या सोबत राहून प्रचार करत असल्यामुळे यावेळी बजरंग (बप्पा) यांना लोकसभेत खासदार होण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. बीडचा खासदार आघाडीचाच होणार तसेच जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीको तसेच विकासाला आणि प्रगतीला साथ देण्याचे आवाहनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा नवनिर्वाचित श्रम व रोजगार विभागाचे चेअरमन वसंत मुंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment