तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

मोताळा शहरामध्ये गुंजला गो व्होट चा नारा
पोलीस दादा सोबत पत्रकार आणि पोलीस पाटील ही म्हणाले गो व्होट

मोताळा:- दि. 11 : जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृतीसाठी सुरू केलेली गो व्होट मोहिम चांगलीच रंगात आली असुन  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ निरूपमा डांगे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण होत आहे. प्रशासनाच्या या मोहिमेतून समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी गो व्होटचा नारा दिल्या जात असताना आज 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता बोराखेडी पोलीस स्टेशन,प्रेस क्लब मोताळा, महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलिस पाटील संघटना च्या संयुक्त विद्यमाने बोराखेडी पोलीस स्टेशन ते बसस्थानक चौक-तहसील कार्यालय अशी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.
        सदरच्या जनजागृती रॅली मध्ये बोराखेडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माधराव गरुड,पोलीस स्टेशनचे कर्मचारी,प्रेस क्लब मोताळा चे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते सदरच्या जनजागृती रॅली ने बोराखेडी पोलीस स्टेशन-बोराखेडी फाटा-बसस्थानक चौक या मार्गाने भ्रमण करीत तहसील कार्यालय मोताळा येथे सदरच्या रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी रॅली मध्ये सहभागी झालेल्या सोबत पादचारी यांनी सुद्धा कोणाच्या ही दबावाला बळी न पडता निर्भय पणे मतदान करावे या करिता मतदान जनजागृतीसाठी गो व्होटचा संदेश दिला आणि 18 एप्रिल 2019 रोजी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी वाहनांवर गो व्होट संदेश चिकटविण्यात आला.

No comments:

Post a Comment