तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 1 April 2019

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे यांचा झंझावात
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दबंग खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांच्या प्रचारार्थ नंदागौळ गणातील मैंदवाडी, सेवानगर तांडा,इंदिरानगर तांडा, दौडवाडी ,येथे प्रचार दौरा करण्यात आला या वेळी भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, गौतम बापू नागरगोजे, अँड. माधव दहिफळे ,गणेश होळंबे ,भुराज बदने ,सोमनाथ गित्ते ,माधव होळंबे, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवाजी राव गुट्टे यांनी ताई साहेबानी केलेली विकास कामे सांगितली व खासदार प्रीतम ताई मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी सर्व गावकऱ्यांनी ताई ना लिड देऊ असा शब्द दिला.

No comments:

Post a Comment