तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

वाँटरकप स्पर्धेत टोकवाडी ग्रामस्थांनी केले श्रमदान


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-तालुक्यातील मौजे टोकवाडी येथे 
सत्यमेव जयते आयोजित वॉटर कप स्पर्धा 2019 अंतर्गत स्पर्धेला सुरुवात झाली आहे.  टोकवाडी ग्रामस्थांनी रविवारी मध्यरात्री 12 वाजता उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांनी श्रमदानास सुरुवात केली. यावेळी सरपंच सौ.गौदावरी मुंडे यांनी श्रमदान करुन उपस्थितांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले. 
यावेळेस मागच्या वर्षी सारखा कमीच पाऊस होणार आहे.. त्यामुळे जास्त पाणी साठवायचा प्रयत्न करूया  म्हणून यावेळेस पण आपण अजून जोमात श्रमदान करूया असे आवाहन त्यांनी केले.

पाणीटंचाई दुर करण्यासाठी टोकवाडी गावाने यावर्षी पाणी फाउंडेशनच्या वाँटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. आज ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशनच्या वाँटर कप स्पर्धेला रविवारी रात्री 12 वाजता श्रमदान करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परळी तालुक्यातील 74 गावासह टोकवाडी गाव स्पर्धेसाठी सज्ज झालेले आहेत. 
पाणी फाउंडेशन व आमीर खान यांच्या संयुक्त माध्यमातून गेल्या 3 वर्षा पासून राज्यात वाटर कप स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे या वर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेत टोकवाडी ने सहभाग घेतला सत्यमेव जयते आयोजित वॉटर कप स्पर्धा 2019 अंतर्गत टोकवाडी गावचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 7 एप्रिल 2019 रविवार रोजी रात्री ठीक 12 वाजता टोकवाडी च्या विद्यमान सरपंच सौ.गोदावरीताई राजाराम मुंडे   व समाज भूषण मा.डॉ.राजाराम मुंडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून टोकवाडी वॉटर कप स्पर्धा 2019 चा उद्घाटन सोहळा दिव्य भव्य वातावरणात  संपन्न झाला.  

सातत्याने पर्जन्यवृष्टी होणारी घट आणि त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी पाऊस पडूनही गावात पिण्याच्या
पाण्यासाठी टॅकरची मागणी करावी लागते. कारण दरवर्षी पडलेल्या पावसाचे पाणी नुसते
वाहून जात असल्याने नापिकी होत आहे. त्यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी
फाउंडेशनच्या वतीने ग्रामस्थांना पाणलोटचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्या अनुषंगाने गावागावात जलयोद्धे तयार झाले असून
याच जलयोध्दांनी गावागावात रात्री बारा वाजता स्पर्धेच्या पहिल्या क्षणापासून ४५ दिवस दुष्काळाशी दोन-दोन हात करण्याची तयारी दाखवली. दरम्यान गावक-यांनी रात्री
अतिशय उत्साहात, जल्लोषात, आनंदात गावागावात श्रमदानाचा शुभारंभ केला. परळी तालुक्यातील काही गावांनी आठ तारखेची सकाळी त्याच आनंदात त्याच उत्साहात आपले
गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदानाला सुरुवात केली. ही श्रमदानाची नांदी ४५ दिवस अहोरात्र आपल्या गावात तेवत
ठेवण्याचे काम या गावातील ग्रामस्थ करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यास प्रशिक्षणार्थी  वैजनाथ मुंडे तसेच गावातील असंख्य तरुण व बचत गटाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.गावातील असंख्य नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.

No comments:

Post a Comment