तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

वैद्यनाथ कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांची लुट करणार्‍या भाजपाला मतदान करणार का ? - धनंजय मुंडे
बजरंग बप्पांना परळीतून मताधिक्यच- प्रा.टि.पी.मुंडे, संजय दौंड, बाबुराव मुंडे
कन्हेरवाडी, नागापूर येथे सभांना मोठा प्रतिसाद

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :-  दि.11.......  मागील 2 वर्षांपासून वैद्यनाथ कारखान्या माध्यमातून शेतकर्‍यांची लुट होत आहे. शेतकर्‍यांच्या ऊसाचे एक-एक वर्ष पेमेंट होत नाही, इतर कारखाने 2200 रूपये भाव देत असताना केवळ 1400 रूपये भाव देऊन बोळवण केली जात आहे. तुमची लुट करणार्‍यांना मतदान मागण्याचा अधिकार नाही. भाजपवाले मतदान मागायला आले तर त्यांना ऊसाचे टिपरू दाखवा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. 

बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आज परळी तालुक्यातील कन्हेरवाडी आणि नागापूर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत हेाते. ज्या साखर कारखान्याला स्व.मुंडे साहेबांनी, स्व.अण्णांनी आशिया खंडात नावलौकीक मिळवुन दिला तोच कारखाना देशोधडीला लावण्याचे काम पंकजाताई यांनी केले. नविन प्रकल्प तर आणता आला नाही, मात्र वारसा हक्काने मिळालेला वैद्यनाथ कारखाना ही चालवता आला नाही. मागील 2 वर्षांपासून या भागातील शेतकर्‍यांची लुट सुरू आहे. बजरंगबप्पा 2200 रूपये भाव 15 दिवसात देतात मग वैद्यनाथ ला का जमत नाही ? असा प्रश्‍न विचारताना शेतकर्‍यांच्या हातावर वर्ष, सहा महिन्यांनी केवळ 1400 रूपये भाव ठेवुन कोट्यावधी रूपयंाची लुट केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपवाले मत मागायला आले तर त्यांना याचा जाब विचारा आणि मतपेटीतून त्याचा रोष व्यक्त करा, असे आवाहन त्यांनी केले.

परळी अंबाजोगाई रस्ता ज्यांना दुरूस्त करता आला नाही, त्यांनी कोट्यावधीचे रस्ते केल्याच्या थापा मारू नयेत. थर्मल का बंद पडले ?  परळी मुंबई रेल्वेचे काय झाले ? वैद्यनाथाला बारा ज्योतिर्लिंगातून वगळताना गप्प का बसलात  ? असा सवाल त्यांनी केला.

ज्या-ज्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस एकत्रित काम करते तेंव्हा-तेंव्हा निवडणुकीत यश मिळते, असा या मतदारसंघाचा इतिहास आहे. यावेळी हे दोन्ही पक्ष एकत्रित आल्याने 100 टक्के यश मिळणारच असा विश्‍वास कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टि.पी.मुंडे, जि.प.सदस्य संजय दौंड, ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांनी व्यक्त केला. 

यावेळी बजरंगबप्पा सोनवणे यांनीही या भागातील शेतकर्‍यांना आपल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मतदान रूपी आशिर्वाद देऊन त्याची परतफेड करण्याचे आवाहन त्यांनी केले. नागापूर येथील सभेत विष्णुपंत सोळंके हे अध्यक्षस्थानी होते, व्यासपीठावर भागवतबप्पा देशमुख, विजय मुंडे, ज्ञानोबा गडदे, लक्ष्मणराव पौळ, प्रदिप मुंडे, सुर्यकांत मुंडे, कुंडलिकराव मुंडे, बळी आघाव, यशवंत सोनवणे, दत्तात्रय ढवळे, मोहनराव सोळंके, विष्णुपंत देशमुख, माणिकभाऊ फड, पिंटु मुंडे, सुर्यभान मुंडे, विनायक राठोड, प्रभुअप्पा तोंडारे आदी उपस्थित हेाते.

कन्हेरवाडी येथील सभेत वरिल मान्यवरांसह बबनदादा फड, माणिकभाऊ फड, देविदासअप्पा फड, निवृत्तीअप्पा फड, प्रा.मधुकरराव आघाव, नगरसेवक शरद मुंडे, अँड. प्रकाश मुंडे, माधवराव मुंडे, दशरथ मुंडे, अमर गित्ते, कोकाटे महाराज, नागनाथ कराड, माणिकराव मुंडे, देविदासअप्पा फड, बंडु मुंडे, केशव पाटील, हनुमंत फड, प्रभाकर गवळी, अंबादास रोडे, चंद्रकांत फड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment