तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

भाजपाने खड्डे नाही बुजवले जिल्ह्याच्या विकासाचा खड्डा पाडुन ठेवला आहे

पंकजाताईंना प्रत्येक जातीची आणि समाज घटकाचीभिती वाटु लागली आहे- धनंजय  मुंडे

बजरंगबप्पाच्या विजयाचा मुंदडा, साठे, दराडे, पोटभरे, मोराळे, हिंगे यांचा निर्धार

नांदुरघाट (केज)  (प्रतिनिधी) :-  दि.10............ भारतीय जनता पार्टीवर आज धनगर, मुस्लिम, मराठा, वंजारा, लिंगायत हे सर्व समाज आणि शेतकरी, ऊसतोड कामगार, युवक, बेरोजगार, महिला नाराज आहेत. या नाराजीमुळेच पंकजाताईला प्रत्येक जातीची आणि समाज घटकांची भिती वाटत असून, ही नाराजी मतपेटीतून 18 एप्रिलला व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. पंकजाताई जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवले असल्याचे म्हणतात त्यांनी खड्डे तर बुजवले नाहीत, जिल्ह्याचा विकासाचा मोठा खड्डा मात्र पाडुन ठेवला असल्याचा टोला  ही त्यांनी लगावला.

बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आज नांदुरघाट, ता.केज येथे भर उन्हातही त्यांची प्रचंड मोठी जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. या सभेस माजी आ.उषाताई दराडे, जनार्धन तुपे, पृथ्वीराज साठे, युवक नेते अक्षय मुंदडा, सुशिलाताई मोराळे, बाबुराव पोटभरे, नमिताताई मुंदडा, कॉंग्रेसचे अशोक हिंगे, मनसेचे सुमंत धस, अंकुशराव इंगळे, नवाब साहेब, नंदुदादा मोराळे, उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, या निवडणुकीत प्रचार करताना पंकजाताई केवळ जातीवर बोलत आहेत, मला प्रश्‍न पडला आहे की, त्यांना कोणत्या जातीची भिती वाटायला लागली आहे ? धनगर समाजाला आरक्षण दिले नाही म्हणुन तो समाज नाराज आहे, मुस्लिम समाज आरक्षणासोबतच असुरक्षिततेमुळे तुमच्यावर नाराज आहे, वंजारी समाजाचे दैवत स्व.गोपीनारावजी मुंडे यांचे औरंगाबादचे स्मारक, ऊसतोड कामगारांचे महामंडळ झाले नाही म्हणुन नाराज आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या तुमच्या भूमिकेमुळे तो समाज तुमच्यावर नाराज आहे, लिंगायत समाज नाराज आहे. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, ऊसतोड कामगार, युवक, महिला असा समाजातील प्रत्येक घटक आज तुमच्यावर नाराज आहे, कारण पाच वर्षात या जिल्ह्यासाठी किंवा कोणत्याही समाज घटकासाठी समाधानकारक काम करू शकलेला नाहीत, हीच नाराजी तुमचा या निवडणुकीत पराभव केल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यातील रस्ते तर तुम्हाला नीट करता आले नाहीत, खड्डे बुजवल्याच्या गप्पा मात्र सुरू केल्या आहेत. खड्डे तर बुजले नाहीत, जिल्ह्याच्या विकासाचा मोठा खड्डा मात्र पाडुन ठेवला असल्याचा टोला त्यांनी लगावला.

यावेळी माजी आ.उषाताई दराडे, जनार्धन तुपे, पृथ्वीराज साठे, अक्षयभैय्या मुंदडा, बाबुराव पोटभरे, सुशिलाताई मोराळे, नमिताताई मुंदडा, अशोक हिंगे यांनी बजरंगबप्पांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. 

यावेळी लिंबराज वाघ, मोहनराव गुंड, शंकर जाधव, तुरूकमारे, शिवाजी जाधव, नेताजी शिंदे, अशोक ताराळकर, प्रशात राऊत, नारायण लोंढे, नामदेव तांबडे, विष्णु हाके, बाबुराव सांगळे, भास्कर दराडे, माऊली होके, नामदेव खाडे, श्रीहरी धस, भास्कर दराडे, आश्रुबा केदार, गहिनाथ भिक्कड, विष्णु मुंडे, फुलचंद मोराळे, उत्तरेश्‍वर हंगे, संजय केदार, अभिमान उगलमोगले, पंडितनाना, राजकुमार मेेटे, सुनिल घोळवे, सुग्रीव कराड, बालासाहेब तांदळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment