तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 April 2019

चार वर्षात मराठवाड्याचा सर्वाधिक विकास-मुख्यमंत्री फडणविसप्रतिनिधी
पाथरी:-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकाळात झाला नाही तेवढा विकास गत चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मराठवाड्यात झाला असुन उद्योग,सिंचन,या सह पन्नास हजार कोटी ची रस्त्यांची कामे करण्यात आली असल्यादा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी पाथरी येथील भाजपा-शिवसेना रिपाई (ए) राष्ट्रीय समाज पार्टी ,रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खा संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारा निमित्त आयेजित केलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बोलतांना केला.
या वेळी मंचावर पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर,सेनेचे उमेदवार खा बंडू जाधव ,आ मोहनराव फड, आ राहुल पाटील, माजी आ रामप्रसाद बोर्डीकर भाजपा चे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे अभय चाटे, सेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश ढगे,मेघनाताई बोर्डीकर, गणेशराव रोकडे, विठ्ठलराव रबदडे,डॉ जगदिश शिंदे आदी सेना भाजपा पदाधिकारी यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की,काँग्रेस दर वेळी गरीबी हटावचा नारा देते आजोबा पंजोबा पासून हेच चालू आहे का गरीबी हटली नव्हती असा काँग्रेस जाहिरनाम्याचा समाचार घेत खरी गरीबी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुर केल्याचा दावा करत उज्वला,जनधन आणि गरीबांना घरकुलं बांधून दिली परभणी जिल्यात ग्रामिण भागात पंधरा हजार पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांची कामे सुरू असून शहरी भागात पाच हजार घरकुलांची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधींचे भाषण म्हणजे मालिका सुरू होण्या पुर्वी दाखवतात तसे काल्पनिक वाटत असल्याचे ही ते या वेळी म्हणाले. देशात ३४ कोटी गरीबांची जनधनची खाती बँकेत उघडली न खाऊंगा न खाने दुंगा म्हणना-या आमच्या पंतप्रधानांनी या जनधन च्या खात्यात एैशी हजार कोटी रुपये शेतकरी,कष्टकरी,गोरगरीबांच्या बँक खात्यात टाकली असल्याचे ते म्हणाले. देशात ९८ टक्के घरां मध्ये आज शौचालय बांधूंन नारींचा सन्मान केला. परभणी जिल्ह्यात ८८ हजार कुटूंबांना उज्वला योजने अंतर्गत गॅस दिला, २०२२ पर्यंत प्रत्येकाला पक्केघर देण्याचा आमचा निर्धार असल्याचे ही मुख्यमंत्री म्हणाले. या सोबतच  तीन लाख लोकांची अतिक्रमने आम्ही नियमित करून देणार आहोत,आयुष्यमान योजने अंतर्गत पन्नास कोटी लोकांना पाच लाख रुपयां पर्यंत मोफत शस्रक्रीया आणि उपचार करत आहेत आज पर्यंत विसलक्ष लोकांनी याचा लाभ घेतल्याचे ही ते म्हणाले. छोट्या व्यवसाईकांना भविष्यात वयाच्या साठी नंतर तीन हजार रुपये पेन्शन देणार असल्याचे ही ते या वेळी म्हणाले. या वेळी सकार निवडुन दिल्यात पुढील काळात शेतक-यांना दर महा पेन्शन देणार असल्याची घोषणा ही केंद्र सकार ने जाहिर नाम्यात केली असल्याचे त्यांनी सांगीतले. पहिल्या सरकार ने दुष्काळात जायकवाडीचे पाणी नाही दिले आम्ही ते दोन वेळा दिल्याचे सांगुन मराठवाड्या साठी पंचविस हजार कोटी रुपये खर्चून वाटरग्रीड तयार होणार आहे या साठी आता "जलशक्ती" या नव्या मंत्रालयाची निर्मिती होणार असल्याचे ही ते या वेळी म्हणाले. शेतक-यांना एक लाख रुपये कर्ज बिनव्याजी देणार आणि पाच वर्ष थकले तरी व्याज नाही आकारणार असे ही ते म्हणाले. पिक विमा कंपनी ने जरी पिकविमा दिला नसेल तरी शासन नुकसान भरपाई देईल आणि ती रक्कम कंपनी कडून सरकार वसुल करेल असेही ते या वेळी म्हणाले.,काँग्रेस आघाडीने पंधरा वर्षात ३२३ कोटी परभणी जिल्ह्या साठी दिले आम्ही चार वर्षात चार हजार कोटींची जिल्ह्यात विकासकामे केल्याचा दावा या वेळी मुख्यमंत्र्यांनी केला  पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्या साठी बंडू जाधव यांना भरगोस मतांनी निवडुन देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
तत्पुर्वी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खा संजय जाधव,विठ्ठलराव रबदडे, राजश्री जामगे, प्रा पि डी पाटील, रविंद्र धर्मे, डॉ उमेश देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक आ मोहनराव फड यांनी केले चार वर्षात २६० किमींची रस्ते बांधली, सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत असलेल्या सर्व रस्ता कामांना मंजुरी मिळऊन घेतली. २० हजार रुग्णांवर मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मोफत शस्रक्रीया केल्याचे सांगुन मराठवाड्यात सतत दुष्काळ येत असल्याने नदिजोड प्रकल्प त्वरीत पुर्ण करून शेकरी सर्व सामाण्यांना दिलासा देण्याचे काम करावे असे आ फड म्हणाले. या सभेचे सुत्र संचलन आणि आभार संजय कुलकर्णी यांनी मानले.

No comments:

Post a Comment