तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 7 April 2019

गेवराई येथील झुंजारनेता संपर्क कार्यालय व यशोदीप ॲडव्हर्टायझिंगचा थाटात शुभारंभ


विशेष प्रतिनिधी..
---------------------
गेवराई, दि. ७ __ येथील नागरिकांचे सहकार्य व विश्वासाच्या बळावर सबंध भागात यशोदीप ॲडव्हर्टायझिंग टॉपटेन मध्ये आहे. आम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचविणारे सुद्धा येथील सुज्ञ नागरिक आहेत. गेवराई शहरातील तापडिया सिटी सेंटर याठिकाणी दैनिक झुंजारनेता संपर्क कार्यालयाचे नूतनीकरण आणि यशोदीप ॲडव्हर्टायझिंग या नूतन दालनाचा भव्य शुभारंभ मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई रामभाऊ मुळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 
          गेल्या अनेक वर्षापासून सेवेची संधी दिली, परिणामी विश्वासाच्या घट्ट नात्याने बांधलो गेलो. सामाजिक, आर्थिक संस्था आणि विविध व्यवसायाच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांनी सेवेची संधी दिली हे आमचे भाग्य समजतो. म्हणूनच.. विविध वृत्तपत्रासाठी जाहिराती  तसेच लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका, व्हिजिटिंग कार्ड, फोरकलर डिझाईन व इतर सर्व प्रकारची छपाईचे कामे तापडिया सिटी सेंटर याठिकाणी सुरू झाले आहेत. उत्तरोत्तर दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने गुढी पाडव्याच्या निमित्ताने गेवराई येथील सामाजिक कार्यातून ठसा मिटणारे गेवराई येथील पत्रकार सुभाष मुळे त्यांचे ज्येष्ठ बंधू दिलीपराव मुळे तसेच रोहित मुळे यांच्या गेवराई शहरातील तापडिया सिटी सेंटर याठिकाणी दैनिक झुंजारनेता संपर्क कार्यालयाचे नूतनीकरण आणि यशोदीप ॲडव्हर्टायझिंग या नूतन दालनाचा भव्य शुभारंभ मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई रामभाऊ मुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सौ. लता मुळे, सौ. शारदा मुळे, कु. किर्तिका मुळे आणि संजय नाना जाधव, रामप्रसाद वाळेकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार, दि. ६ एप्रिल २०१९ रोजी संपन्न झाला.
          आयोजित करण्यात आलेल्या या समारंभ याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गेवराई येथील विधान परिषदेचे माजी आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेशराव हात्ते, सरपंच शिंगणे, लहु हातागळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अरूणराव चाळक, रिपाइंचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, किशोर सोनवणे दत्ता हात्ते, पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलिपराव शिंदे, विद्यमान सदस्य शामराव कुंड, रामकिसन मोटे, भाऊसाहेब मोटे, दिनकरराव गंगाधर, सुनिल सागडे, प्रसिद्ध व्यापारी गोपालसेठ जाकीटे, सुरेंद्र रुकर, प्रशांत जाकीटे, रामजी महासाहेब, झुुंजार नारी मंचच्या तालुकाध्यक्ष सीता महासाहेब उपाध्यक्ष सौ. दक्षा सानप तसेच चिंतेश्वर शाळेच्या मुख्याध्यापक सुषमा मोरगावकर, डॉक्टर असोसिएशन ओमप्रकाश भुतडा, डॉ. नंदकिशोर लोया, डॉ. मनोज मडकर, योगेश पाटील, हरिप्रसाद सोनी, रोहित भैय्या पंडित, भारतीय जीवन विमा निगमचे बाळासाहेब जैन, वैजनाथ रुकर, रामसेठ झंवर, सत्यनारायण झंवर, गणेश जैन, मनोज सोमाणी, बालाप्रसाद सोनी, रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक संभाजीदादा करांडे, बजरंग ग्रुपचे सहकारी संजय गायकवाड, गणेश कापसे, मधुकर बारगजे, बंडू बारगजे, शिवाजीराव खिंडकर, सुनीलराव मडकर, राजु सोनी, राधेश्याम खंडेलवाल, सोहेब आत्तार, यांच्यासह सर्व पदाधिकारी गेवराई व पंचक्रोशीतील विविध सामाजिक संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, सदस्य, अनेक सरपंच, चेअरमन, पोलीस पाटील आदींसह सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य कार्य करणारे नागरिकांनी या सोहळ्याप्रसंगी भेट दिली.
       आलेल्या प्रत्येकांचे स्वागत आदरातिथ्य यशोदीप ॲडव्हर्टायझिंगच्या वतिने संपादक दिलिपराव मुळे, झुंजारनेताचे पत्रकार सुभाष मुळे, रोहित मुळे, यश मुळे, दिपक मुळे आदींनी केले. आलेल्या प्रत्येक नागरिकांनी या नूतनीकरण कार्यालय व यशोदीप ॲडव्हर्टायझिंग या दालनाला उपस्थितांनी मनापासून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment