तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 April 2019

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते


बीड, (प्रतिनिधी) :-  महाराष्ट्र दिनाच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. 1 मे 2019 रोजी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी 8.00 वाजता पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.
ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8.00 वाजता होणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांना मुख्य समारंभास उपस्थित राहता यावे यासाठी या दिवशी  सकाळी 7.15 ते 9 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावासा वाटल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 7.15 वाजण्यापूर्वी किंवा 9.00 वाजेनंतर करावा. अशा सुचना शासनाने दिल्या आहेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण धरमकर यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a comment