तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

परळीच्या विकासात खिळ घालण्याचे पाप पालकमंत्र्यांनी केले- धनंजय मुंडे

रस्त्यांसाठी 138 व नाल्यांसाठी 140 कोटी आणणार  ; 1500 घरकुले देण्याचेही आश्‍वासन

परळीत भाजपला मतदान मागण्याचा अधिकार नाही- प्रा.टि.पी.मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.11....... परळीच्या विकासासाठी मी जीवाची बाजी लावुन प्रयत्न करीत असताना भाजपच्या पालकमंत्र्यांनी मात्र परळीच्या विकासात खिळ घालण्याचे पाप केले आहे. कितीही अडचणी आल्या तरी परळीचा चेहरामोहरा मला बदलायचा असून, त्यासाठी रस्त्यांसाठी 138 तर नाल्यांसाठी 140 कोटी रूपये मंजुर केल्याचे व 1500 नविन घरकुल देण्याचा शब्द विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

     बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शहरातील आझादनगर भागात झालेल्या विराट जाहीर सभेत ते बोलत होते. परळीच्या लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासासाठी कोणतेही काम केले नसल्याने त्यांना मतदान मागण्याचा कसलाही अधिकार नसल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टि.पी.मुंडे यांनी या सभेत सुनावले. 

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, नगर परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने विकास कामात खोडा घालण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले. विकासकामे रोखली, जाणीवपूर्वक विकासनिधी बांधकाम खात्याला वर्ग केला, मात्र बांधकाम खात्याकडूनही यांना काम करता आले नाही. परळीकरांवर माझा जीव आहे, विश्‍वास आहे, येणार्‍या काळात परळी शहरात विकासाचे एकही काम शिल्लक राहणार नाही. मी राज्यभर फिरत असलो तरी, माझा जीव तुमच्यात आहे. उद्या महाराष्ट्रात जातोय आता जवाबदारी परळीकर जनतेची आहे, शहरातून सर्वाधिक आघाडी देऊन बजरंग सोनवणेंना लोकसभेत पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्र्यांनी परळी शहरासाठी केलेले एक तरी काम त्यांनी सांगावे असे आवाहन ही दिले.

   या सभेला प्रमुख पाहुणे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टि.पी.मुंडे, जि.प. सदस्य संजय दौंड, या सभेच्या अध्यक्षस्थानी रज्जाक भाई, सोपान ताटे, बहादूर भाई, शेकापचे भाई मोहन गुंड, जि. प.सदस्य प्रदीप मुंडे, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, माजी शहराध्यक्ष चांदूलाल बियाणी, नगरसेवक संजय फड, सुरेश टाक, विजय भोयटे, भाऊड्या कराड, शरीफ भाई, शंकर आडेपवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे, सिराज भाई, नाझर भाई, जीवनराव देशमुख, समद सेठ, काकडे सर, रवी मुळे, दत्तात्रय ढवळे, अनंत इंगळे, रज्जाकभाई बागवान, महमंद इसाक भाई, सलाउद्दीन मामु, अर्चनाताई रोडे, अन्नपूर्णाताई जाधव, नाजेर हुसेन, अल्ताफ पठाण, राज हजारे, सुरेश नानवटे, केशव गायकवाड, वाजेद खान, रफिक पटेल, सचिन मराठे, महेबूब कुरेशी आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

वैजनाथ दहोतोंडेंना श्रध्दांजली वाहुन गणेशपारची सभा रद्द

      आझादनगर येथील सभेनंतर गणेशपार भागात सभा होणार होती, मात्र या भागातील मनसे नेते वैजनाथ दहातोंडे यांची आज सायंकाळी दुःखद निधन झाल्याने सभास्थानी आलेल्या धनंजय मुंडे  व सर्व मान्यवरांनी दहातोंडे यांना  श्रध्दांजली अर्पण करून सभा रद्द केली. युवक चळवळीतील एक आघाडीचा कार्यकर्ता आपण गमावला असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment