तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 April 2019

आझाद नगर भागात पाणी प्रश्न गंभीर न प ने तात्काळ प्रश्न सोडवावे अन्यथा आंदोलन-आझादनगर मिञमंडळ


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
सध्या राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती झालेली आहे व याचा परिणाम परळी शहरावर हि काही प्रमाणात झालेला आहे अश्या परिस्थितीत मात करण्यासाठी एक कार्यसक्षम प्रशासन म्हणुन या दुष्ळाळ परिस्थितीवर उपाय योजना करुन नागरिकांची चिंता दुर करणे हि नगर परिषद ची जबाबदारी आहे परंतु यामध्ये नगर परिषदची उदासीनता दिसुन येत आहे यावर त्वरित उपाय योजना करुन प्रश्न मार्गी लावावे व आझाद नगर भागात पाणीचे टँकर संख्या वाढविण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना आझाद नगर मिञमंडळ तर्फे देण्यात आले..
नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र 08 मधील आझाद नगर भागात पाणी पाणी टंचाई चा प्रश्न निर्माण झालेला आहे ,म्हणुन या भागात नगर परिषद तर्फे एक दिवासा आड टॅकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात यावे तसेच टॅकर सोबत पालीकेचे कर्मचारी नेमण्यात यावे जेणेकरुन शिस्त पध्दतीने पाणी पुरवठा होईल तसेच परळी शहरात राज्य शासनाकडुन जी पाणी पुरवठा योजना मंजुर झलेली होती त्याचे काम अंतिम टप्यात आले आहे काही भाग लोक कनेक्शन घेत आहे आझाद नगर मध्य ही नगर परिषद मार्फत कनेक्शन देणे सुरु आहे परंतु प्रत्येक व्यक्ती स्वखर्चाने कनेक्शन घेऊ शकत नाही आर्थिक दुर्बळ परिस्थिती मुळे त्या अनुषंगाने  आझाद नगर मधील प्रत्येक गल्ली मध्य सार्वजनिक वापरासाठी एक कनेक्शन आरक्षीत ठेवण्यात यावे तसेच स्वच्छतेवर न प विशेष लक्ष द्यावे  अन्यथा मिञ मंडळ आंदोलन चा मार्ग स्विकारण्यात येईलअशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी शेख अख्तर हमीद,राजा खान,गुलाब पठाण नेते,सय्यद जाफर सर,लुकमान खान,शेख तौहीद,सोहेल बागवान,गौस पटेल,फिरदोस पठाण,शेख नजीर,शेख सलीम,मोईन बागवान,खदीर बागवान,सकलैन खान,शफाअत खान,शेख असलम,शेख आफान,फेरोज जनाब,मोबीन खान,शेख तय्यब आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment