तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 April 2019

परळीतील बस डेपोत ट्रामॅक्स मशीन नसल्यामुळे वेळापत्रक कोलमडलेमशीन आणि पेपररोल नसल्यामुळे अनेक बस जागेवर थांबून; प्रवाशांची हेळसांड

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

 परळी बसडेपोचा कारभार म्हणजे "आंधळा आदळतो आणि कुत्रा पीठ खातो" अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकारी एसी कार्यालयात बसून कारभार चालवत असल्याने परळीसह जिल्ह्यातील सर्वच बस स्थानकातील बसचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे अगोदरच उन्हाने होरपळत असलेल्या प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका बसत असल्याने प्रवाश्यात संताप व्यक्त केला जात आहे.

परळी बस डेपो म्हणजे "असून अडचण नसून खोळंबा" अशी अवस्था झाली आहे, राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या कोणत्याच सुविधा बस्थानाकात उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे प्रवाशांना तिकीट देण्याच्या अनेक मशीन खराब झाल्या आहेत त्या मशिन दुरुस्त केल्या जात नाहीत तर पेपर रोल सुद्धा वेळेवर दिला जात नसल्याने वाहकाना मोठया अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशी माहिती अनेक एसटीच्या कर्मचाऱ्यान कडून समजली आहे, त्यामुळे कर्मचारी बस स्थानकात वेळेवर उपस्थित असले तरी डेपोच्या ढासळत्या कारभाराचा मानसिक आणि आर्थिक फटका मात्र प्रवाशांना बसत आहे. तसेच  घाणेरडे संडास- बाथरूम, पाण्याचा ठणठणाट , घाणीचे साम्राज्य, थुंकलेले कोपरे, प्रवाशी बसण्याच्या ठिकाणी धूळ तसेच बसचे वेळापत्रक सांगण्यासाठी कंट्रोलरुम मध्ये कर्मचारी वेळेवर बसत नाही. तर बस स्थानकात खड्डे, दगडगोटे झाल्याने प्रवाश्यांना नीट चालता येत नाही. सर्वात मोठी परळीकरांच्या अभिमानाची बाब म्हणजे पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे दोन मात्तबर नेते असताना परळी बस्थानकाची अशी अवस्था व्हावी हे येथील जनतेचे दुर्भागेच म्हणावे लागेल.

No comments:

Post a comment