तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 April 2019

वाढदिवसाचा खर्च टाळून केली श्रमदान करणाऱ्यांना मदत सरपंच सीमाताई घनवटे,पाणी फाऊंडेशनचा पुढाकार
गंगाखेड (प्रतिनिधि) :-  वेगवेगळे विकास कामात अग्रेसर  राहून नेहमी चर्चेत असणाऱ्या वाघलगाव येथे आगळावेगळा वाढदिवस  साजरा करण्यात आला.  य पाच वर्षे बालकाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून त्या खर्चातून पाणी फाउंडेशन साठी श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांना चहापाणी व नाश्त्याचा उपक्रम राबविण्यात आला. असा आगळावेगळा 'साईराज' चा वाढदिवस शनिवारी पार पडला .
वाघलगाव तालुका गंगाखेड येथील ग्राम ग्रामस्थांच्या पुढाकारातून गावात मागील पंधरा दिवसांपासून श्रमदान सुरू आहे. पाणी फाउंडेशन च्या मार्गदर्शनाखाली व सरपंच सीमाताई नारायणराव धनवटे यांच्या सहभागातून हे श्रमदान सुरू आहे. यात गावातील महिला, पुरुष, बालके मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. श्रमदानात गावातील बालकांचा सहभाग व उत्साह पाहता गावातील बालकांचे वाढदिवस हे श्रमदान चालू असलेल्या ठिकाणी श्रमदान करून साजरे करावेत ही संकल्पना ग्रामपंचायत सदस्य, सरपंच पती नारायणराव धनवटे यांनी मांडली. यास ग्रामस्थांनी दुजोरा दिला. त्यातच शनिवारी ग्रामपंचायतचे शिपाई माधव धनवटे यांचा मुलगा साईराज याचा पाचवा वाढदिवस होता. वाढदिवसावर  होणारा अवास्तव खर्च टाळत साईराज चे वडील तथा ग्रामपंचायत शिपाई माधव घनवटे यांनी हा खर्च श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांसाठी चहापाणी व नाश्त्यावर करण्याचा मनोदय बोलून दाखवला. त्यास सरपंच सीमाताई धनवटे यांनी दुजोरा देत त्यांचे स्वागत केले. ठरल्याप्रमाणे सकाळी सात वाजताच साईराज वाढदिवस श्रमदान करत असलेल्या गावालगतच्या शेतात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील महिला, पुरुष व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच व ग्रामस्थांनी साईराज शुभेच्छा दिल्या. व त्याचे आई अकिता व वडील माधव घनवटे सह गावकरी उपस्थित  होते.  यावेळी पाणी फाऊंडेशन च्या अधिकारी सागर सर, राऊत मॅडम उपस्थित होत्या

No comments:

Post a comment