तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

परळी मतदारसंघातुन बजरंग सोनवणेंना विक्रमी मताधिक्य राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांचे पत्रक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी मतदारसंघातुन विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड लोकसभेचे संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना व्रिकमी मताधिक्य मिळणार आहे. असा विश्‍वास राष्ट्रवादी युवक कॉंंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी व्यक्त केला आहे. 
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात डॉ.मुंडे यांनी सांगितले की, स्व.गोपीनाथ मुंडे यांचा सक्षमपणे राजकीय वारसा चालविण्याची ताकद धनंजय मुंडे यांच्यामध्येच असल्याचे परळीच्या जनतेने यावेळी चांगलेच ओळखले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पूर्ण ताकदिशी बजरंग सोरवणे यांच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघ पिंजून काढत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड लोकसभेचे संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना विक्रमी मताधिक्य मिळणार आहे. असा विश्‍वास राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment