तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 17 April 2019

मंगरूळपीर येथे सर्वधर्म समभावाने साजरी झाली भिमजयंतीनगरसेवक अनिल गावंडे यांचा पुढाकार

फुलचंद भगत (जिल्हा प्रतिनीधी)
वाशिम-जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे दि.१४ एप्रील रोजी सर्वधर्मसमभावाने भिमजयंती मोठ्या ऊत्साहात साजरी झाली असुन नगरसेवक अनिल गावंडे यांनी या जयंती ऊत्सवात सहभाग नोंदवला.
        विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात संपुर्ण जगभर साजरी करन्यात येत असते.या जयंती ऊत्सवामध्ये भिम अनूयायी विविध कार्यक्रम घेवून जयंती साजरी करत  असतात.अशीच भिमजयंती मंगरूळपीर येथे साजरी करन्यात आली.नगरसेवक अनिल गावंडे यांनी भिमजयंतीची मिरवणूक अकोला चौकात आली असता स्वतः सहपरिवार बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन आणी हारार्पन केले तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत भिमअनूयायांचे स्वागत केले एवढेच नाही तर बाबासाहेबांच्या गान्यावर मोठ्या ऊत्साहाने निळा झेंडा हाती धरून नाचुन मिरवणूकीतही सहभाग नोंदवला.विविध मंडळांच्या मिरवणूका अकोला चौकात आल्यानंतर गावंडे यांनी सर्वांचे स्वागत करत सर्वधर्मभाव जोपासला.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment