तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

रोजगार हमीच्या माध्यमातून रोजगाराना काम मिळेना


बदनापुर प्रतिनिधी  अंकुश कदम पाटील
दुष्काळात मंजुरांना काम मिळावे या साठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून  सामाजिक वनीकरण व कृषी कार्यालयामार्फत रोजगार हमी योजने अंर्तगत कामे केली जातात .
रोजगार हमी योजनेचे काम म्हणजे अर्ध्यात आम्ही अर्ध्यात तुम्ही अशी गत सध्या बदनापुर तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बघायला मिळते आहे.सामाजिक वनीकरणा मार्फत दर वर्षी करोडो रुपये खर्च करुन झाडे लावा झाडे जगवा उपक्रम राबविण्यात येतो मात्र तो कागदोपत्री असतो असे चित्र बघायला मिळते .या मुळे दुष्काळाचा परीणाम जास्त होत असुन याकडे संबंधित खात्याचे सबसेल दुर्लक्ष असल्याचे जानवत आहे वास्तविक पाहता रोजगारा ( मंजुरांना )मार्फत खडे करुन झाडे लावली गेली पाहीजेत व रोजगार मिळाला पाहीजे असा नियम आहे .या नियमाला केराची टोपली दाखवून सध्या सामाजिक वनीकरणामार्फत तालुक्यातिल डोगराळ भागात  जेसीबीने खंड्डे करण्याचे काम चालू आहे.या बाबत संबंधित कर्मचाऱ्यांना विचारले असता उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले व प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करतांना दिसत आहे याचा अर्थ असा की अधिकारी तुपाशी व दुष्काळ परिस्थितील सामान्य कामगार उपासी अशी स्थिती झाली आहे.
----------------------------------------------------------
----------------------------------------------------------
  *तेजन्युज हेडलाईन प्रतिनिधी*
-----------------------------अंकुश कदम पाटील *8390515197* -----------------------------
----------------------------------------------------------

No comments:

Post a Comment