तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 April 2019

परळीचा अट्टल गुन्हेगार बीडसह उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  चोरीचे गुन्हे करुन पोलिसांना सळो की पळो करुन सोडणाºया अट्टल गुन्हेगारास शुक्रवारी तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. परळी ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावावरुन उपविभागीय अधिकाºयांनी हे आदेश काढले.

अमोल संभाजी डुमणे (३०, रा. भीमनगर, परळी) असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. परळी शहर, संभाजीनगर, सिरसाळा तसेच परळी ग्रामीण ठाणे हद्दीत त्याने धुमाकूळ घातला होता. शिवाय शेजारील जिल्ह्यातही त्याने दहशत निर्माण केली होती. त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक भारत राऊत यांनी त्याच्याविरुध्द कलम ५६ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव उपअधीक्षकांकडे पाठविला होता. उपअधीक्षक सुरेश गायकवाड यांची प्रस्तावाची चौकशी करुन त्याला तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची शिफारस केली होती. उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी शुक्रवारी अमोल डुमणे यास बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी शुक्रवारी त्यास ताब्यात घेऊन नांदेड जिल्ह्यातील वजिराबाद येथे नेऊन सोडले. अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर अधीक्षक अजित बोºहाडे, उपअधीक्षक सुरेश गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भारत राऊत यांनी ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment