तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 April 2019

देवेगाव शाळा व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध


अध्यक्षपदी सौ.संगीता ताई विनायकराव गलबे तर उपाध्यक्षपदी सौ.रंजना माणिकराव गलबे.

 बिनविरोध निवड करून देवेगावकारांनी निर्माण केला आदर्श

आज दि. 29 एप्रिल 2019 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवेगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना निर्माण करण्यासाठी पालकसभा आयोजित करण्यात आली.पालक सभेसाठी बहुतांश पालक उपस्थित होते.पालससभेसाठी प्रत्येक वर्गातील पालक उपस्थित होते. पालकसभेत सर्वप्रथम पालकसभाघेण्यामागचा उद्देश व शाळा व्यवस्थापन समितीच्या शासन निर्णनायबद्दल पठाण वहाबखान यांनी माहिती सांगितली.त्यानंतर ज्ञान फौंडेशनचे उजगिरे सर यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
     त्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्येक वर्गातून सदस्यांची निवड करण्यात आली.पहिली वर्गातून विजयकुमार शिवाजी लालझरे व त्रिवेणी श्यामसुंदर गलबे,दुसरी  वर्गातून शंकरराव रामेश्वर गलबे व भाग्यश्री प्रकाशराव लालझरे,तिसरी वर्गातून युसूफ गफूर पठाण व मीरा देविदास सवणे,चौथी वर्गातून बळीराम दादाराव गलबे व निशा राजेभाऊ खंदारे,पाचवी वर्गातून मंदाकिनी ममलेश्वर तोडकरी व अशोक भानुदास डोंबे,सहावी वर्गातून संगीता विनायक  गलबे व रंजना माणिक गलबे तर सातवी वर्गातून रत्नाकर रुस्तुमराव गलबे व शोभा तुकाराम मगर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शिक्षणप्रेमी म्हणून राजेभाऊ शरदराव शिंदे यांची निवड झाली.
   सदरील शाळा व्यवस्थापन समिती स्थापन होण्यासाठी गावचे सरपंच प्रतिनिधी शिवाजीराव गलबे उपसरपंच प्रतिनिधी श्यामराव गलबे,तंटामुक्ती अध्यक्ष मचिंद्र गलबे,माजी सरपंच माऊली गलबे,शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र येलदरे,शाळेतील शिक्षक माधव हाडुळे, पठाण वाहबखान,सुजाता महाजन,विजयमला शिंगण व समस्त पालक व गावकऱ्यांनी प्रयत्न केले.समस्त उपस्थितांनी शाळेच्या विकासासाठी तनमन धनाने सहकार्य करण्याचे ठरवले. 
शेवटी सर्वांचे आभार गोरख ताल्डे यांनी मानले.

No comments:

Post a comment