तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 1 April 2019

सेलूत प्राध्यापिका- सेविकात शाब्दिक राडा नोटीस मात्र सेविकांना ;नामांकित महाविद्यालयातील प्रकार


 सेलू !प्रतिनिधी

शहरातील एका नामांकित  महाविद्यालयात सेविका असलेल्या महिला  कर्मचाऱ्यास त्‍याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेने हुज्जत घालून उभयतात शाब्दिक राडा झाला.परंतु वरिष्ठांशी  उध्दट पणे बोलली म्हणून त्या सेविकांना नोटीस बजावण्यात आली. वास्तविक पाहता जेवढी सर्विस महाविद्यालयात या  सेविकांची झाली तेवढे वय सुद्धा या प्राध्यापिका मॅडमचे नाही. शिवाय या प्राध्यापिका मॅडम बाहेरगावाहून महाविद्यालयात लागल्यापासून ये -जा करतात या संदर्भात त्यांना महाविद्यालयाने कधीही दुखावले नाही. अथवा यासाठी  नोटीस देखील बजावली नाही. हा प्रकार शनिवार 30 मार्च रोजी या महाविद्यालयात दुपारी १२ ते २ वाजता च्या दरम्यान महाविद्यालयाच्या प्राचार्या समोर घडला असल्याचे कळते. याबाबतची माहिती या प्रमाणे या नामांकित महाविद्यालयात एका बैठकीदरम्यान नियुक्त करण्यात आलेल्या दोन्ही सेविका बैठकीच्या वेळी उपस्थितांची बडदास्त ठेवण्यात हजर नसल्यामुळे उद्भवला. झाले असे की बैठकी दरम्यान चहापान  व अन्य सोयीसाठी महिलांना प्राद्यापिकिंना महिलाच सेवक कर्मचारी तर पुरुषांना प्राद्यापकांना पुरुष सेवक कर्मचारी सेवा देतात असा या महाविद्यालयात अलिखित नियम असल्याने महिला कर्मचाऱ्यांना महिला सेविका नसल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना चहापान न मिळाल्याने हा प्रकार पुढे आला. या बैठकीदरम्यान अनुपस्थित असलेल्या सेविकांनी ही सेवा देण्यास कामचुकारपणा केला. वास्तविक पाहता एका महिला सेविकाला तर प्राचार्यांच्या केबिन समोर नियुक्त करण्यात आले होते. तर दुसरी सेविका नेमकी कुठे गेली होती हे मात्र समजू शकले नाही. परिणामी या बैठकीत  चहापानाची सेवा मिळाली नाही म्हणून आकसबुध्दीने उभयतांनी प्राचार्याच्या समोरच शाब्दिक राडा करुन गोंधळ घातला.  घडल्या प्रकाराची शिक्षा म्हणून दोन सेविकांना खुलासा करण्याबद्दल आणि वरिष्ठांना उद्धटपणे बोलल्याबद्दल शनिवारी सायंकाळी नोटीस देण्यात आली. या महाविद्यालयात कोण किती प्रामाणिकपणे काम करते. यावरून नेहमीच आपसात खटके उडतात. आणि नोटीस मात्र सेविका सारख्यांना दिली जाते. हे आजच्या घडलेल्या प्रकारावरून पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. या प्रकाराकडे महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय मंडळाने वेळीच लक्ष दिले नाही तर कधी  मोठा भडका उडेल हे मात्र सांगता येत नाही. सर्वजण प्राचार्याच्या स्वभावाच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. बळी जातात ते नोटीस मिळणारे.

No comments:

Post a Comment