तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 April 2019

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉ.प्रितमताई मुंडेंनी केली प्रचाराला सुरूवात खासदार भोगलवाडीत आल्या,आणि ग्रामस्थांनी एक मुखी निर्णय दिला


चांगलं काम करण्यासाठी मला फक्त आशिर्वाद द्या - डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे 

बीड   (प्रतिनिधी) :- बीड लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांनी आज निवडणूक प्रकारासाठी घराबाहेर पडतांनाच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परळीयेथील पुतळ्यास अभिवादन  केले. भोगलवाडी ता.धारूर पट्यात त्या आल्या ,कासारी,कांदेवाडी,बोडखा मार्गे झंजावती दौरा करतांना गावच्या गाव बाहेर आले आणि त्यांचं जबरदस्त स्वागत केलं. भोगलवाडीत सहज भेटीला आल्या  आणि रूपांतर जाहिर सभेत झालं. भोगलवाडीच्या लोकांनी ताई आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे  उभा आहोत. हे सांगतांना जणू काही एक मुखी निर्णय घेतला आणि मतदानाचा संकल्प केला. साहेबाच्या रूपात लेकीला पाहणार्‍या गावकर्‍यांनी खासदाराचं दमदार भाषण ऐकलं. बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मला संधी द्या. पाच वर्ष संधी मिळाली मी सोनं करून दाखवलं.पुन्हा आशिर्वाद द्या मी ना.पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात केंद्रातुन विकासाची गंगा आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्‍वास  प्रितमताईंनी दिला आणि लोकांच प्रेम पाहुन त्या भारावून गेल्या. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती औचित्य साधुन प्रितमताई जिल्ह्यात निवडणूक प्रचारात बाहेर पडल्या तेंव्हा अगोदर परळीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशिर्वाद घेतला. धारूर तालुक्यातील कांदेवाडी, कासारी, बोडखा, भोगलवाडी, कावंदरा, चोंडी, मोहा, मैंदवाडी या गावात सकाळी झंजावती दौरा करून कॉर्नर बैठका घेतल्या.गावा गावात प्रितमताईंच जंगी स्वागत केलं त्यांच्या दौर्‍याची कल्पना मिळताच महिला,पुरूष,लहान थोर रस्त्यावर आले.स्व.गोपीनाथ मुंडेवर प्रेम करणारा हा भाग आणि त्यांचीच लेक येणार म्हणताच आगळी वेगळी उत्सुकता लोकांच्या मनात होती. त्या आल्या, त्यांनी संवाद केला, अतिशय परखड आणि भाषणातून प्रत्येक गावकर्‍यांची मनं जिंकुन गेल्या. त्यांच्यातला भावस्पर्श लोकांना मुंडे साहेबांची आठवण करून देणारा वाटला. भोगलवाडी गावात राजकीय दृष्ट्या विरोधकांनी लाभ घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता मात्र हा पट्टा मुंडे साहेबांचा हक्काचा आणि बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्रितमताई येणार याची कल्पना मिळताच सारं भोगलवाडी गाव विशेषत: महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात आशिर्वाद देण्यासाठी बैठकीला आला. अनेक महिलांनी मुली तु घाबरू नकोस,आमच्या साहेबाची लेक हाय, तुला आम्ही लय मतांनी निवडून देऊ । हा निर्धार उमेदवारांच्या समक्ष बोलुन दाखवला. ठिकठिकाणी बोलतांना प्रितमताई यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अठरा पगड जाती धर्माच्या लोकांनी बाबांवर प्रेम केलं. दुर्देवाने  नियतीनं आपणास पोरकं केलं. मात्र पंकजाताई सारखं खंबीर नेतृत्व पाठीमागे उभा राहिलं बाबांच स्वप्न साकार करण्याचं आम्ही खांद्यावर ओझ घेतलं आहे. माझ्या जिल्ह्यात रेल्वे यावी हे त्यांचे स्वप्न होतं मी अवघ्या तीन वर्षात पुर्ण करून दाखवलं. शेतकरी,कष्टकरी,उसतोड कामगार यांच्या जिवनात आर्थिक परिवर्तन यावं गोर गरीबांच आयुष्य सुधरावं यासाठी आम्ही जिल्ह्यात चांगल काम करतं आहोत.स्वाभीमानाचं राजकारण करतांना घाणेरड्या राजकारणापासून दुर राहुन फक्त लोकांची सेवा यापेक्षा आम्ही  काहीच केलं नाही, पाच वर्षात कर्तृत्व सिध्द केलं म्हणून मला मतदान मागण्याचा अधिकार आहे. विरोधकांनी निवडणूकीत अपप्रचार करून लोकांची दिशाभुल करण्याचं काम सुरू केलेलं आहे. मात्र वर्तमान राजकीय परिस्थितीत जिल्ह्याचं भविष्य बघा देशाला नरेंद्र मोदी सारख्या कनखर पंतप्रधानाची गरज आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची तसं बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पंकजाताईंच नेतृत्व महत्वाचं आहे, ज्यांना कोणी वाली नाही अशा लोकांचा आवाज बणुन आम्ही भगिनी काम करत आहोत. उपेक्षित,दिन दलित,वंचीत आणि शेवटच्या मानसाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्याचं  काम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाच्या संसदेत मी काम करतं आहे. मी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर, ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नावर आणि अविकसित भागावर संसदेत आवाज उठवला, पुन्हा मला संधी द्या, विरोधकांच्या दिशाभुल भाषणाला बळी पडू नका राजकारणात लोक येतात सोंग करतात नाटक करतात मात्र आपलं राजकीय भविष्य कोणाच्या हातात दिल्यानंतर आपला विकास होवू शकतो याचा अभ्यासपुर्वक विचार करा आणि मला आशिर्वाद द्या मी बाबांच्या स्वप्नातला बीड जिल्हा पुर्ण करून दाखवण्यासाठी सुदभर मागे राहणार नाही. असं त्यांनी ठणकावुन सांगितले आणि प्रत्येक ठिकाणी गावकर्‍यांनी मतदान देण्याचा एकमुखी निर्णय बैठकीतच सांगुन दिला. या दौर्‍यात मतदार संघाचे आ.आर. टी.देशमुख,मोहन जगताप, डॉ.स्वरूपसिंह हजारी,केशव दादा आंधळे, शिवाजी मुंडे, महादेव आण्णा बडे, सुदाम बडे,नानाभाऊ बडे, महादेव  तोंडे, गोरख धुमाळ, अंगदराव मुंडे, सौ.मिराताई गांधले, अरूण राऊत, अर्जुन तिडके, गणेश बडे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment