तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

पत्रकार महावीर जालन यांना जन्मभूमी पुरस्काराने गौरविण्यात आलेबाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : प्रति वर्षे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उलेखणीय कार्य करणाऱ्याचा व्यक्तीचा सन्मान केला जातो. यंदा सकाळ'चे ईट येथील बातमीदार महावीर जालन यांच्यासह पाच जणांना जन्मभूमी पुरस्काराने गौरवण्यात आले. 
येथील वेताळ स्वामी मंदिर परिसरात सोमवारी [ता.१५] रात्री नऊ वाजता  पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला.पत्रकारिता क्षेत्रातून ग्रामीण भागात उलेखनिय कार्य केल्या बदल सकाळचे ईट येथील बातमीदार महावीर जालन , शैक्षणिक क्षेत्रातून जिल्हा परिषदचे सहशिक्षक नागेश बोडके , सामजिक क्षेत्रातील सचिन थोरात , समीर नाईकवाडी , शेती क्षेत्रातून पांडुरंग आहेर , व्यापार क्षेत्रातून बळीराम कळासे यांना यंदा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आशिष पाटील , ग्रामपंचायत सदस्य प्रशांत रोटे , जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सुभाष गिरी ,बाजीराव अहिरे ,अरुण कांबळे, सोमनाथ तौर , ग्रामपंचायत सदस्य शाहूराज आहेर ,  आप्पासाहेब थोरात , अविनाश बोराडे , बाबासाहेब अहिरे , सतिश थोरात , बप्पा अहिरे , महादेव जाधव , विशाल अहिरे आदी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment