तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 17 April 2019

हनुमान गड येथील हनुमान जन्मोत्सवास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
येथील आरोग्यदायी वन मारूती, हनुमान गड येथे शुक्रवार दि.१९ एप्रिल रोजी होणार्‍या हनुमान जयंती उत्सवाची पुर्ण तयारी हनुमान गड सेवा समितीच्या सदस्यांनी केली असून या हनुमान जन्मोत्सवास परळी शहर व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन हनुमान गड सेवा समितीच्या सदस्यांनी केले आहे. 
येथील आय.टी.आय.कॉलेजच्या दक्षिणेस आय.टी.आय कॉलेजपासून २ कि.मी. अंतरावर बालाघाट डोंगररांगातील एक उंच टेकडीवर श्रीनिवास पाळवदे यांच्या संकल्पनेतून या आरोग्यदायी वन मारूतीची स्थापना आठ वर्षापूर्वी करण्यात आली.  ज्या टेकडीवर या मंदिराची स्थापना करण्यात आली त्या टेकडीचे हनुमान गड असे नामांकरण करण्यात आले.  हे ठिकाण अंबाजोगाई रोड पासून ३ कि.मी. अंतरावर असून येथील वातावरण अगदी निसर्ग रम्य, प्रदूषण मुक्त आहे.  ते मानवी आरोग्यासाठी निरोगी, पोषक आहे. 
येथे हनुमान मंदिर स्थापने मागचा हेतू एवढाच आहे की, या परिसरात शहरातून आपल्या निरोगी आरोग्यासाठी पहाटे (सकाळी) व संध्याकाळच्या वेळी व्यायामासाठी फिरावयास येणार्‍या प्रत्येक पुरूष, महिला व युवक नागरिकांने या मंदिरापर्यंत चालत यावे व चालत जावे तसेच मंदिर परिसरात व्यायाम करावा हा आहे.   या परिसरातील वातावरण निरोगी आरोग्यासाठी खूप चांगले व अनुकूल आहे. आता रोज सकाळ/संध्याकाळ या ठिकाणा पर्यंत फिरायला व व्यायामासाठी येणार्‍यांची संख्या जवळपास २५० ते ३०० च्या आसपास आहे. या मंदिरातील हनुमान मुर्तीची पुजा गेल्या पाच वर्षापासून पवन आईसक्रीम चे मालक श्री काळे मामा हे अखंडितपणे पहाटे ४ ते ५ च्या वेळात करतात.
हनुमान मंदिर स्थापनेपासून येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.  भाविक भक्तांच्या सहकार्याने त्याचे स्वरूप वरचेवर मोठे होत आहे.  सुरूवातील १०० च्या आसपासच्या उपस्थितीवरून हा उत्सव ७०० ते ८०० भाविक भक्तांच्या उपस्थितीवर गेला आहे. 
येथील जयंती उत्सवाचे वैशिष्टे म्हणजे भाविक भक्ताकडून नगदी स्वरूपात देणगी घेतली जात नाही. ज्या भाविक भक्तांना जयंतीच्या दिवशी जो प्रसाद भाविकांना द्यायचा आहे तो ते स्वतः आणून वाटू शकतात किंवा सेवा समितीकडे सुपूर्द करू शकतात. गेल्या दोन-तीन वर्षापासून नगदी स्वरूपात देणगी न घेता सेवा समितीने भाविकांना त्यांच्या स्वइच्छेने प्रसाद म्हणून फळे, खाद्यपदार्थ आणून वाटण्याची मुभा दिली आहे.  त्यामुळे लंगर पध्दत सुरू झाली आहे.  प्रसाद म्हणून खिचडी, गोड पदार्थ, फळ, असे अनेक पदार्थ प्रसाद म्हणून सेवा समितीचे सदस्य व भाविक भक्तांकडून वाटप केले जाते.  जवळपास १५ ते २० पदार्थांची प्रसाद रूपाने वाटप होते.  याचा भाविक भक्त आनंदाने लाभ घेतात. या लंगर उपक्रमास भाविकांचा वरचेवर मोठा प्रतिसाद मिळत आहे.
यावर्षी सुध्दा शुक्रवार दि.१९ रोजी होणार्‍या हनुमान जयंती उत्सवाची पुर्ण तयारी गड सेवा समितीच्या सदस्यांनी केली असून जयंती उत्सवाच्या दिवशी सकाळी ठिक ६ वा. हनुमान मुर्तीची विधिवत महापुजा करून लागलीच महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.  तरी या हनुमान जयंती जन्मोत्सवास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन हनुमान गड सेवा समितीचे प्रमुख श्रीनिवास पाळवदे, जगदिश कांदे, गणपत मुंडे, बंडू अघाव, नितीन ढाकणे, काळे मामा (पुजारी), विक्रम स्वामी, शिवाजी अघाव, सुरज गिले, अनंत मुंडे, रमाकांत शेप, गोपीनाथ चौरे आदिंनी केले आहे.

No comments:

Post a Comment