तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 2 April 2019

केदारखेडा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल येथे रंगले चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन !महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती व्हावी हाच यामागचा हेतू : गणेश सोळुंके (व्यवस्थापक, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल, केदारखेडा)

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे घडवले दर्शन : रासीकप्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

चिमुकल्यांचा नृत्याविष्कार पाहून पालक झाले मंत्रमुग्ध...!

(भोकरदन ग्रामीण)
--------------------------------

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुलमध्ये "बहर : चिमुकल्या पावलांचा" वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.रामेश्वर विद्यालयाचे प्राचार्य श्री.एस.एन.बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामेश्वर सोनावणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माधवराव हिवाळे, सिनेकलाकार शरद काकडे, ईश्वर मोरे, शाळेचे सचिव विलास काळे, उपाध्यक्ष बालासाहेब करतारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश सोळुंके यांनी केले. 
यावेळी विद्यार्थ्यांनी भक्तीगीत, देशभक्ती गीत, पोवाडा, कोळी गीत, महाराष्ट्र दर्शन, गोंधळ, लावणी, भारूड, बालगीत या सारख्या महाराष्ट्राची परंपरा सांगणाऱ्या विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करत सर्वांची मने जिंकली. तर महाराष्ट्र दर्शन, एकच राजा इथे जन्मला, शेपटीवाल्या प्राण्यांची सभा या गीतांमधील वेशभूषा विशेष आकर्षण ठरले.
सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच शाळेच्या सॉफ्टवेअर चे व पालकांसाठी मोबाईल अप्लिकेशन चे उदघाटन सुद्धा यावेळी करण्यात आले.
कार्यक्रम यशश्वीरित्या पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख कु.दया पवार, सौ.सुवर्णा सोळुंके, सौ.एस.एन.ठोंबरे, रुपाली अग्रवाल, सरिता काळे आदी शिक्षकांसह श्रीमती सविता जाधव, विलास ढवळे, अकिल शेख, विष्णू खिल्लारे, अंकुश सोलाट, ऋषिकेश काळे यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन : महाराष्ट्राला जो विविध कला प्रकारांचा सांस्कृतीक वसा लाभला आहे. तो या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या मनात रुजावा व आजच्या नव्या पिढीला महाराष्ट्राची तसेच ग्रामीण संस्कृतीची माहिती व्हावी या उदात्त हेतूने महाराष्ट्राची विशेष ओळख असणाऱ्या गीतांचाच यात समावेश केला असल्याचे शाळेचे व्यवस्थापक गणेश सोळुंके यांनी सांगितले.

╭════════════╮
   ▌ 
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment