तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

मोदी, फडणवीसच्या काळात नागरिकांची घोर निराशा देशाच्या विकासासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनाच विजयी करा- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.15
     मागील पंचवार्षीक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने प्रत्येक नागरिकांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जाम करण्याचे दिलेले आश्‍वासन हवेतच उरले असुन बेरोजगार तरुणांच्या तोंडाला पाने पुसले आहेत. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्‍या मोदी सरकारने भारतीय नागरिकांवर नोटाबंदी करुन बुरे दिन आणले आहेत. अशा फसविणार्‍या मोदी सरकारला पुन्हा सत्तेवर येऊ देऊ नका, भाजपा युतीच्या उमेदवारांना पराभुत करुन त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारत सरकारच्या महाराष्ट्र ग्रामिण बँकचे माजी संचालक बाबुराव मुंडे यांनी प्रचार दौर्‍यात बोलतांना केले. 
    परळी तालुक्यातील नागापुर, कन्हेरवाडी व केज येथे बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ज्येष्ठ बाबुराव मुंडे बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस माजी खासदार रजनी पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 
    बाबुराव मुंडे यांनी ठिकठिकाणच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकुन टिका केली. विविध घोटाळ्यात भाजपा युतीचे सरकार अडकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा भरतीचे अंमलबाजवणी केली नाही. मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी रखडत ठेवली आहे. त्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात मतदारात असंतोष आहे. हा असंतोष लोकसभा निवडणुकीत प्रकट होईल. व युतीच्या उमेदवारांचा दारुण पराभव होऊन पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. असा अशावादही व्यक्त केला. देशात परिवर्तनाची लाट असुन राहुल गांधी पंतप्रधान होतील. असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. पाच राज्याच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्याचा दाखलाही त्यांनी दिला. खरा विकास देशात काँग्रेसच्याच काळात झालेला आहे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी प्राण पणाला लावला देशातील नागरिक गांधी कुटुंबियांचे योगदान विसरणार नाहीत. 
    नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, मुखेड, नायगाव येथेही बैठका घेण्यात आल्या. यावेळी त्यांच्यासोबत आ.वसंतराव चव्हाण, काँग्रेस पक्षाचे नेते मनिशंकर आयर, संपतकुमार, हनुमंतराव बेटमोगरेकर व काँग्रेसचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
    देशात काँग्रेस व आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी मतदान करुन संसेदत निवडून पाठवावे असे आवाहन ही बाबुराव मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment