तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 4 April 2019

गुडीपाडव्याला भगव्या ध्वजाची गुडी उभारावी - प्रसाद देशमुखसंभाजी ब्रिगेड तर्फे आवाहन 


रिसोड महेंद्रकुमार महाजन 

 - मराठी नववर्षाच स्वागत मनहून साजरा करण्यात येत असलेल्या गुडीपाडव्याला अनिष्ठ रूढी परंपरा नाकारून भगव्या ध्वजाची गुडी उभारावी असे आवाहन संभाजी ब्रिगेड विध्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख बाप्पू यांनी केले आहे.

मराठी नववर्षाचे स्वागत मनहून गुडीपाडव्याला घरावर गुडी उभारण्यात येते.या दिवशी घरावर उलटा गडवा,साडीचोळी , कडुलिंबाची पाने ,गाठी लावून गुडी उभारली जाते. या संदर्भात मराठा सेवा संघ -संभाजी ब्रिगेड अनेक वर्षांपासून समाजात जनजागृती करत आहे . नागरिकांनी अनिष्ट रूढी परंपरा सोडणे आवश्यक आहे . या दिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येत आले होते .त्यामुळे सर्वानी आनंदाने गुढ्या उभारल्या होत्या .त्याची आठवण मनहून आपण आजही गुढ्या उभारतो. पण संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर गुढिच स्वरूप बदललं गेलं.या दिवशी  सर्वानी पारंपरिक रूढी परंपरेला फाटा देत स्वराज्याचे वारसदार संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करावं. प्रतीमा पूजन झाल्यावर सर्वानी भगव्या ध्वजाची गुडी उभारून नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख बाप्पू यांनी केले आहे ....

प्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन    
              जैन रिसोड 
9420352121  9960292121

No comments:

Post a Comment