तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 3 April 2019

'शिवसेनेच्या हट्टासाठी भाजपने किरीट सोमय्यांच्या स्वप्नांचा गळा दाबला' – धनंजय मुंडेमुंबई (प्रतिनिधी) : - भाजपचे ईशान्य मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेशी घेतलेला पंगा महागात पडला आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने आगामी लोकसभेसाठी सोमय्यांचे तिकीट कापले आहे. सोमय्यांऐवजी मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सोमय्यांचा पत्ता कट केल्याने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपचा समाचार घेतला. ते म्हणाले, शिवसेनेच्या हट्टापायी भाजपने किरीट सोमय्यांच्या स्वप्नांचा गळा दाबला आहे. अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्या स्वप्नांचाही भाजपने असाच चुराडा केला आहे. 'तिकीट वंचित आघाडी'च्या बॅनरखाली या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन मोदींविरोधात आघाडी करावी आणि मोदींना धडा शिकवावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने प्रचारसभांचा धडाकाही सुरु केला. मात्र, ईशान्य मुंबईत भाजपचा उमेदवार अजूनही ठरलेला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघातून माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असताना शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपची कोंडी झाली होती.

No comments:

Post a Comment