तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

गेवराईचे फोटोग्राफर अर्जुन चाळक पाडळसिंगी जवळ अपघातात ठारसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ९ ( प्रतिनिधी ) शहरातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर अर्जुन शहादेव चाळक ऊर्फ बबड्या (वय ४०) हे मादळमोही गावी दुचाकीने जात असताना पाडळसिंगी जवळ समोरून येणाऱ्या एका वाहनाने जोराची धडक दिली, परिणामी त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. ९ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
        अर्जुन शहादेव चाळक गेल्या अनेक वर्षापासून फोटोग्राफर चा व्यवसाय करतात. गेवराई शहरातील पंचायत समिती लगत त्यांचा हा व्यवसाय आहे. या क्षेत्रात त्यांनी उत्तम कामगिरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत असे. उत्कृष्ट फोटोग्राफर तसेच त्यांचा आणि मितभाषी स्वभाव सर्वश्रुत आहे. अर्जुन आपल्या मादळमोही या गावी डॉ. शेख अजिज यांच्या बरोबर दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग २११ व २२२ रस्त्यावरुन जात असताना समोरून येणाऱ्या एका वाहनाने जोराची धडक दिली, परिणामी अर्जुन चाळक हे जागीच ठार झाले तर डॉ. शेख अजिज हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान तब्बल दीड तासापासुन मृतदेह घटनास्थळी पूडूूून होता. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे उपस्थितांंनी सांगितले. घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment