तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

धर्मापुरी गणातून बजरंग सोनवणेंना सर्वाधिक मताधिक्य मिळणार-माधव मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवेण यांच्या प्रचारार्थ व विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक कॉंगे्रसचे युवा नेते माधव मुंडे यांनी धर्मापूरी गणातुन सोनवणेंना सर्वाधिक मताधिक्य मिळणार असल्याचा विश्‍वास मुंडे यांनी व्यक्त केला. 
केंेद्रातील भाजप-शिवसेना सरकारच्या धोरणांवर जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. १५ लाखांच्या स्वप्नांचं काय झालं ? असा प्रश्न जनता आता पंतप्रधान मोदींना विचारत आहे. मोदी १६५ देश फिरून आले पण आपल्या देशासाठी काही केलं नाही नुसती लोकांची फसवणूक मात्र केली. उत्पादन खर्चावर आधारित शेती मालाला भाव स्वामिनाथन आयोग लागू का करीत नाहीत असा सवाल त्यांनी केला तसेच बँकेला चुना लांवणारे पळून जातात मग चौकीदार काय करतोय? असंही ते म्हणाले. तसेच विकास कुठं दिसत नाही. बुलेट ट्रेन काय कामाची जिथं साधी रेल्वेशी गाठ पडत नाही. हे भाजपवाले घटना बदलतील आणि हुकूमशाही सुद्दा आणतील अशी भीती व्यक्त करीत ते म्हणले की, वैद्यनाथ कारखान्याने शेतकर्यांना नागवलं त्यांना मत मागण्याचा हक्क नाही. तरुण, शेतकरी कर्जमुक्त व शेतमालाला दीडपट हमीभाव मिळण्याचे कायदेशीर अधिकारासाठी शेतकर्‍यांनी महाआघाडी उमेदवार बजरंग सोनवणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. या सरकारला रुमण्याची भाषा कळते त्यांना आता मतपेटीतून दणका देण्यासाठी बजरंग बप्पा सोनवणे यांना विजयी करा असेही ते यावेळी म्हणाले.  सर्वसामान्य शेतकर्‍यांचा हक्काचा आवाज शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी आपसातील गट-तट संपुष्टात आणून प्रचंड मतांनी निवडणून आणा असे आवाहन ग्रामपंचात सदस्य हाळम तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे युवा नेते माधव मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment