तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 April 2019

कुट्टी केलेल्या पाचटाला आग लागू चार एक्कर उस जळाला;एक जन जखमी;जवळा झुटा येथील घटना


प्रतिनिधी
पाथरी:-वाढत्या  तापमानात शहरा सह तालुक्यात आगीच्या घटना वारंवार घडत असून रविवारी दुपारी दिड ते दोनच्या सुमारास जवळा झुटा येथील शेतक-याच्या खोडवा उसातील कुट्टी केलेल्या पाचटाला आग लागून चार एकरातील हिरवा उस जळाला.या वेळी आग विझवण्यास गेलेला शेतक-याचा  मुलाचा हात भाजल्याची घटना घडली.
तालुक्यातील जवळा झुटा येथेल शेतकरी निरंजन ठाकू राठोड, शेषकला निरंजन राठाेड, ठाकू देऊ राठोड यांची गट नं ६३ मध्ये चार एकर जमिन असून यात उसाची लागवड केलेली आहे.हा उस ऑक्टोबर मध्ये कारखाण्याला गेल्या नंतर या वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने या शेतातील पाचटाची यंत्रा व्दारे कुट्टी केली होती.सहा महिने वयाच्या या उसातील कुट्टी केलेल्या पाचटाला रविवारी दुपारी दिड ते दोन वाजन्याच्या सुमारास अचानक आग लागली.ही आग नेमकी कशाने लागली हे मात्र समजु शकले नाही.आग लागल्याचे लक्षात येताच या ठिकाणी या शेतक-याचा  मुलगा राजेश निरंजन राठोड आणि शोभा राजेश राठोड हे वरच्या शेतात पालवी खांदत होते या वेळी यांनी आणि राहुल निरंजन राठोड यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला यात राजेश राठोड यांचा डावा हात भाजला तर पत्नी शोभा यांच्या साडीने पेट घेतला ला वेळी प्रसंगावधान राखत राहुल या दिराने साडी ओढून काढल्याने पुढील अनर्थ टळल्याचे शेतकरी निरंजन राठोड यांनी सांगीतले दरम्यान पाण्याची काहीही व्यवस्था नसल्याने जवळा झुटा लोणी या रस्त्या लगत असलेला हा चार एकर उस जळून खाक झाल्याने शेतक-याचे  मोठे नुकसान झाले आहे.जखमी राजेश राठोड यांना तातडीने आष्टी येथील खाजगी दवाखाण्यात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या विषयी पाथरीच्या तहसीलदार यांना निवेदन देऊन या विषयी पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निरंजन राठोड यांनी केली आहे.

No comments:

Post a comment