तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 April 2019

ना पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांची थट्टा केल्यामुळे परिवर्तन अटळ―प्रा.टी.पी.मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
केंद्र व राज्यातील सत्ता हातात असतानाही ना पंकजा मुंडे व खा प्रीतम मुंडे यांनी कोणतेही विकासाचे मोठे काम केले नाही निवडणूक आली की वडिलांच्या नावाची आरोळी ठोकून भावनेचे राजकारण करण्याचे नाटक उघडे पडल्याने व शेतकऱ्यांची जनतेची थट्टा केल्याने लोकसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी. मुंडे सर यांनी व्यक्त करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय होणारच असा दावा केला.


       काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आयोजित नागापूर कन्हेरवाडी आझाद नगर येथील सभेत प्रा टी पी मुंडे सर बोलत होते यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे महाआघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


        पालकमंत्री ना पंकजा मुंडे व खा प्रीतम मुंडे यांच्या कार्यशैलीवर प्रा टी पी मुंडे सर घणाघाती टीका केली व त्यांनी केंद्र व राज्यातील सत्ता हातात असतानाही विकासाचे कोणते मोठे काम केले ? कोणतीही निवडणूक आली की वडिलांच्या नावाचे आरोळी ठोकून भावनेचे राजकारण करण्याचे नाटक केले शेतकरी कष्टकरी सामान्य जनता  यांची थट्टा करण्याचे त्यांचे  नाटक उघडे पडल्याने बीड लोकसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय होणारच असल्याचा दावा केला.


        काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महाआघाडीच्या नेत्यांनीही भाजपाच्या खोटारड्या पणावर प्रखर टीका करून बजरंग सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.


       या प्रचार सभांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे जि प सदस्य संजय दौंड युवक काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष कथा मार्केट कमिटीचे उपसभापती विजय मुंडे जि प सदस्य बबनदादा फड जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे जि प सदस्य प्रा डॉ मधुकर आघाव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ ज्येष्ठ नेते भागवत बप्पा देशमुख काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड विष्णुपंत सोळंके काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभू अप्पा तोंडारे विष्णुपंत देशमुख राष्ट्रवादीचे युवा नेते माणिक भाऊ फड काँग्रेसचे सेवादलाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब देशमुख माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय ढवळे अभिमन्यू शिंदे कुंडलिकराव मुंडे छत्रपती कावळे पंचायतराज चे तालुकाध्यक्ष यशवंत सोनवणे मार्केट कमिटीचे संचालक रामकिसन घाडगे सेवा सोसायटीचे चेअरमन श्रीकिशन  सातभाई आत्माराम नागरगोजे आदी सह महाआघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment