तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

मताधिक्य कायम ठेवण्याचे राष्ट्रवादी पुढे तर परंपरागत मतदार वळविण्याचे भाजपापुढे आवाहन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
मागील लोकसभा निवडणुकी नंतर झालेल्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये विधान पदिषद विरोधी पक्षनेते ना.धंनजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा परळी तालुक्यात रोवला गेला. या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुढे हेच मताधिक्य कायम ठेवण्याचे आवाहन आहे. तर लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या म्हणुन डॉ.प्रितमताई मुंडे दुसर्‍यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंपरागत मतदार आपल्या बाजुने वळविण्याचे आवाहन त्यांचे पुढे आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्पयात कोण बाजी मारतो यावर दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबुन आहे.
राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी मागील साडेचार वर्षाच्या काळात परळी तालुक्यातील ग्रामिण भागात रस्ते विकास, ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कामांसाठी मोठा निधी मंजुर केला. परंतु ग्रामिण भागातील कार्यकर्त्यांशी थेट संबंध नसल्यामुळे त्यांच्या बद्दल नाराजी आहे. या नाराजीतुन मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटीच्या निवडणुकीत  मतदारांनी रोष व्यक्त केला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पाठीशी युवा वर्गाचे मोठे पाठबळ असल्याने या सर्व निवडणुकांमध्ये त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. परंतु ही लोकसभा निवडणुक असुन या निवडणुकीत मुद्द वेगवेगळे असल्याने मताधिक्य कोण घेणार यावर अवघ्या काही महिन्यात येऊन ठेपलेल्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपच्या वतीने ना.पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी परळी तालुक्यातील गाव, वाड्या, तांड्यावर प्रत्यक्ष जावून प्रचार केल्याने त्यांच्यासाठी पोशख वातावरण केले आहे. परळी विधानसभा मतदार संघात परळी व अंबाजोगाई या दोन्ही तालुक्यातील गावांचा समावेश आहे. परळी तालुक्यातील गावांमध्ये परंपरागत भाजपाचा मतदार असला तरी अंबाजोगाई तालुक्यातील गावामध्ये    त्या भागातील स्थानिक नेत्यांचा प्रभाव आहे. हे नेते मंडळी कोणाच्या बाजूने कौल देता यावर या निवडणुकीचे मताधिक्य अवलंबुन आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदार संघात वैद्यनाथ साखर कारखान्याचे ऊस बिल, परळी-अंबाजोगाईचे रखडलेले काम, परळी बाह्य वळणाचे हे मुद्द चांगलेच गाजत आहेत. वैद्यनाथ कारखान्यामुळे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना कांही प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. ही निवडणुक रंगीत तालीम समजली जाते. मागील लोकसभे नंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकामध्ये मिळविलेले यश कायम ठेवण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पुढे आहे. तर मागील साडेचार वर्षात आपण काय विकास केला. या मुद्दयावर जनतेसमोर जातांना किती मताधिक्य मिळविणार याचे आवाहन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्यापुढे आहे. एकुणच संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात जो उमेदवार मताधिक्य घेईल त्याचा विजय निश्‍चित मानल्या जातो. यानिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह प्रचारात उतरले असुन राष्ट्रवादीच्या मदतीला परळी तालुक्यात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, कम्युनिस्ट पक्षाचे सर्व पदाधिकारी सोबत असुन आप आपल्या विभागात प्रचार करत आहेत. तर खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या साठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, रासपा, रिपाई, भगवानसेना या सर्व मित्र पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. या सर्व नेत्यांना परळी तालुक्यातील मतदार किती प्रमाणात लाईक करतो हे येणार्‍या दि.१८ तारखेलाच कळेल.

No comments:

Post a Comment