तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

धनंजय मुंडेंच्या हस्ते पद्मश्री सय्यद शब्बीर यांचा सत्कार


शिरूर (प्रतिनिधी) :-  दि.09......... जनावरांना आपल्या र्‍हदयाशी कवटाळून त्यांच्याशी एक वेगळे नाते निर्माण करणार्‍या पद्मश्री सय्यद शब्बीर यांची आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट देऊन सपत्नीक सत्कार केला.

बीड लोकसभेच्या प्रचारानिमित्त श्री.मुंडे आज पाटोदा येथे गेले होते, याच गावातील रहिवाशी सय्यद शब्बीर यांना मागील महिन्यात सरकारने पद्मश्री हा सन्मान देऊन गौरव केला होता. श्री.मुंडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व आशिर्वाद घेतले. त्यांच्या कार्याने आपल्याला प्रेरणा मिळाली आहे, शासनाचे कसलेही अनुदान न घेता मागील 20 वर्षांपासून मुक्या जनावरांची निस्वार्थ सेवा करणार्‍या शब्बीर भाईंचा अभिमान वाटतो, त्यांना मिळालेला सन्मान हा संपुर्ण बीड जिल्ह्यासाठीच अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment