तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना विक्रमी मताधिंक्यांनी विजयी करा-कैलास फड


बँक कॉलनीत कैलास फड यांचा डोअर टु डोअर प्रचार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
बीड लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, व मित्र पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष कैलास फड यांनी बँक कॉलनी परिसरात डोअर टु डोअर प्रचार करुन प्रचार फेरी काढण्यात आली. प्रितमताई मुंडे जिल्ह्याला सक्षम व कार्यतत्पर आणि महिलांचा सन्मान वाढवणार्‍या खासदार लाभल्याने जिल्ह्याच्या विकास झपाट्याने होत आहे. महिलांचा सन्मान करुन महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असलेलया खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना विक्रमी मताधिक्यांनी विजयी करा असे आवाहनही फड यांनी केले.
बीड लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, व मित्र पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ बँक कॉलनी परिसर प्रचार फेरी काढुन पिंजुन काढाला त्यावेळी भाजपाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष कैलास फड मतदारांशी संवाद साधतांना बोलत होते.  प्रितमताई मुंडे यांच्या रुपाने बीड जिल्ह्याला उच्च शिक्षित, अभ्यासु खासदार लाभल्या ही जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. गेल्या चार वर्षांत विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रितमताईमुंडे यांनी अविरतपणे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे रेल्वेसारखा रखडलेला प्रश्न असो की जिल्ह्यात सर्वत्र पसरलेले रस्त्याचे जाळे. महिला बचतगट तसेच महिला बालकल्याण व ग्रामविकास विभागाच्या वतीने अनेक योजना राबवून लोकहितवादी निर्णय घेतले.  ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचा विडा उचलला असुन, त्यादृष्टीने त्यांनी  जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचे विकास कामे प्रत्यक्षा राबवली, जिल्ह्यात पूर्वी खडतर रस्ते होते त्यामुळे दळणवळणाच्या समस्या निर्माण होत. ही समस्या दुर करण्यासाठी मुंडे भगिनींनी जिल्हयात नऊ राष्ट्रीय महामार्ग आणले.  या दोन मुंडे भगिनींनी जिल्ह्यात विकासाची एक नवीन गंगा आणली. परंतु विरोधकाकडे आरोप करण्यासाठी मुद्दे नसल्यामुळे केवळ जातीयवादी राजकारण केले जात आहे. मराठा अन वंजारी समाजात दुहीची बीजे केवळ क्षणिक राजकीय फायदेशीर पणे पेरण्याचे जाणिवपुर्वक केले जात आहे. तसेच महिलांचा तात्काळ कर्ज सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही त्यांनी प्रयत्न केले. एकणुच या दोन्ही मुंडे भगिनींमुळे महिला मानस्मान मिळत आहे. त्यामुळे या जिल्ह्याला खासदार प्रितमताई मुंडे यांच्या सारख्या कार्यतत्पद खासदारी गरज आहे. तरी महिला मतदारांनी विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता कायम महिलांचा सन्मान देणार्‍या डॉ.मुंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करुन पुन्हा लोकसभेत पाठवावे. विकासाच्या मुद्द्यावर जातीपेक्षा मातीशी घट्ट नाळ जोडणार्या प्रितमताई मुंडे यांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी नेहरकर, अक्षय रोडे, प्रल्हाद सुरवसे, मयुर शेप, महादेव ढाकणे, पांचाळ आदि उपस्थित होते.
उपस्थित होते. बँक कॉलनीत काढलेल्या प्रचार फेरीस उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला असुन डॉ.प्रितमताई मुंडे यांना लोकसभेत पुन्हा  पाठविण्याचा मतदारांनी निर्धार केला आहे.

No comments:

Post a Comment