तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 5 April 2019

मंगरुळपीर येथील न.प.क्र.४ च्या विद्यार्थ्यांनी काढली मतदान जनजागृती रॅली
फुलचंद भगत, जिल्हा प्रतिनिधी
मंगरुळपीर-दि.५ एप्रील/मतदानाची टक्केवारी वाढावी आणी लोकांची मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी येथील नगर परिषद क्र.४ च्या विद्यार्थ्यांनी शहरातुन रॅली काढून मतदान जनजागृतीचे घोषवाक्ये देवुन संदेश दिला.
         आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारांनी विश्वासर्हतापुर्वक आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी प्रशासनाकडुन विविध मार्गे ऊपक्रमाव्दारे ऊपाययोजना करन्यात येत आहेत.या होणार्‍या मतदानाविषयी मतदारांची जनजागृती व्हावी यासाठी शहरातील मुख्य चौकातुन नगर परिषदेच्या क्र.४च्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीवर घोषवाक्य देत रॅली काढली.या रॅलीची सुरुवात न.प.प्रशासन अधिकारी डि.एस.बन्सोड यांनी हिरवी झेंडी दाखवून केली.या रॅलिमध्ये शाळेचे सर्व  शिक्षक आणी कर्मचार्‍यांच्या सोबतच बहूसंख्य विद्यार्थ्यांची ऊपस्थीती होती. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी .पी .राठोड, संतोष मांगूळकर , जगदीश नायक ,विठ्ठल वाघमारे , बाबसाहेब सायगुंडे  , सुप्रिया खडसे  , मीना खूने  , मालती गिरे आदीं शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment