तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 April 2019

धनंजय मुंडेंच्या हस्ते उद्या बुधवारी परळी तहसिल कार्यालयात ध्वजारोहणदुष्काळ आणि पाणी टंचाई संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना भेटणार

परळी (प्रतिनिधी) :- दि.30.......... राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे दि.01 मे रोजी बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून, त्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त परळी तहसिल कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. दुष्काळ व पाणी टंचाईच्या अनुषंगाने ते बीडमध्ये जिल्हाधिकार्‍यांनाही भेटणार आहेत.

सकाळी 08 वाजता परळीच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात श्री.मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याचे तहसिलदारांच्यावतीने कळविण्यात आले आहे. परळी शहरासह तालुक्यात व जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या संदर्भात श्री.मुंडे हे सकाळी 11 वाजता बीड येथे जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे श्री.मुंडे यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले.

No comments:

Post a comment