तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

शिक्षण बहुजनापयर्र्ंत नेण्याचे महान कार्य महात्मा फुले यांनी केले - पो.नि.बाळासाहेब पवारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  काही समाजापुरते मर्यादित असलेले शिक्षण बहुजन समाजपर्यंत  नेण्याचे महान कार्य राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी केले असे प्रतिपादन परळी शहर संभाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले. ते महात्मा फुले व भाररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते.
शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक जी.बी.शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी नगर स्था.गु.शाखेचे  रमेश सिरसाठ, ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, फुले-शाहू-आंबेडकर अभ्यासक इंजि. भगवान साकसमुद्रे, रमेश सरवदे, विठ्ठल पोगुलवाड, सौ.पुष्पाताई घोबाळे, उर्दु माध्यमाचे मुख्याध्यापक इम्रान सर आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सचिन रोेडे व मित्र मंडळींच्यावतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पोलीस निरीक्षक पवार पुढे म्हणाले की, शिक्षणाने व्यक्ती मानव बनतो. त्याच्यातील अज्ञान दारिद्रय नष्ट होते. याप्रसंगी रानबा गायकवाड, भगवान साकसमुद्रे यांनी आपल्या भाषणात थॉमस पेनचे राईटस ऑफ मॅन आणि एज ऑफ रिजन या पुस्कातील मानवी मुल्ये भारतात रूजविण्याचे काम केले. तर मुख्याध्यापक शेख यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमास आदर्श शिक्षक सय्यद अखील, सोलनकर, सरवदे सर, इंगळे सर, गायकवाड सर, मुंडे सर, नजीर अहमद, अहसान सर, सय्यद शाकेर, शिक्षिका सौ. पोदार, सौ. गर्जे यांच्यासह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन रोडे, अंनिसचे विकास वाघमारे, बिंदुसार रोडे, ओम दहिवडे, राहुल इंगळे, विकी व्हावळे आदिंनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन ए.तु.कराड यानीं तर आभार सय्यद अखील यांनी केले.

No comments:

Post a Comment