तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 2 April 2019

मतदानावर बहिष्कार टाकलेल्या ग्रामस्थांशी अधिका-यांनी साधला संवाद
प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील बाभळगाव महसुल मंडळा तील गावां सह पाथरीतील वाघाळा गावच्या ग्रामस्थांनी पिकविमा न मिळाल्या मुळे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे निवेदन दिल्याने पाथरीचे उपविभागिय अधिकारी व्हि एल कोळी यांच्या सह तहसिलदार भाग्यश्री देशमुख,गटविकास अधिकारी बी टी बायस तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने सोमवार एक एप्रिल रोजी वाघाळा, लिंबा,आनंदनगर,गुंज या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
तालुक्यातील बाभळगाव मंडळातील ग्रामस्थांनी दुष्काळ जाहिर असतांनाही खरिपाचा पिक मिळाला नसल्याने कान्सूर,बाभळगाव,आंधापुरी, लोणी,डाकूपिंप्री, गुंज,लिंबा,आनंदनगर आणि पाथरी मंडळातील वाघाळा गावाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्या यातिल प्रत्येक गावात महसुल आणि कृषी विभागाचे अधिकारी जाऊन ग्रामस्थां सोबत चर्चा करत आहेत.सोमवारी १ एप्रिल रोजी उपविभागिय अधिकारी व्हि एल कोळी हो स्वत:  वाघाळा, लिंबा, आनंदनगर, गुंज या गावात अधिका-यां सह उपस्थित राहून ग्रामस्थां सोबत चर्चा केली.आणि मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उपविभागिय अधिकारी कोळी आणि अधिकारी यांनी केले.  या वेळी तालुका कृषी अधिकारी शिंदे यांनी यातील तांत्रिक बाबींची माहिती ग्रामस्थांना दिली.मात्र जो पर्यंत पिकवपिक मिळणार नाही तोर्यंत ग्रामस्थ निर्णयावर ठाम राहाणार असल्याचा निर्णय घेतल्याचे उपविभागिय अधिकारी यांनी तेजन्यूज शी बोलतांना सांगितले.

1 comment:

  1. सर कानसुर सोबत पण कृषि आधिकरी नायब तहशीलदार आले होते पण तुम्ही बातमी दिली नव्हती..?

    ReplyDelete