तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई : क्रिकेट म्हटले की लोक अक्षरशः सुट्टी मारून सामन्याचा आस्वाद घेत असतात आणि भारतात सर्वात जास्त ओढ असते ती भारत आणि पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहते ज्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते, ती अखेरीस झाली. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी हा संघ जाहीर केला.
भारतीय संघ -
शिखर धवन, रोहित शर्मा,विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात
 आला.
15 सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा ही अनुभवी जोडी त्याच्या मदतीला असणार आहेत. भारतीय संघाने 1983 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. 2007 मध्ये भारताने ट्वेंटी-20 विश्वचषकही नावावर केला आहे. विशेष म्हणजे 2011च्या विश्वचषक विजेत्या संघातील सात खेळाडू 2019 च्या स्पर्धेतही खेळणार आहेत.

No comments:

Post a Comment