तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

मनसेचं उत्तम नेटवर्क कॉंग्रेस राष्ट्रवादी युती साठी समाधानाची बाब

बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : राजधानी मुंबईत भाजप-शिवसेनेचा बोलबाला असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण व आम आदमीच्या मतदारांचा बुस्टर फॅक्‍टर आघाडीसाठी समाधानाची बाब असल्याचे चित्र आहे. 
मुंबईतल्या सर्वच्या सर्व सहा लोकसभा मतदारसंघात मनसेचा मतदार असला तरी उत्तर मुंबई, उत्तर पुर्व, उत्तर पश्‍चिम व दक्षिण मुंबई मतदारसंघात मनसेचं उत्तम नेटवर्क आहे. या मतदारसंघात मनसेच्या कट्टर कार्यकर्त्यांची फळी असून स्थानिक प्रश्नांबाबत त्यांनी आंदोलन उभारत जनतेत जावून पक्षाची लढाऊ प्रतिमा कायम ठेवली आहे. 
राजधानी मुंबईत भाजप-शिवसेनेचा बोलबाला असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण  मतदारांचा बुस्टर फॅक्‍टर आघाडीसाठी समाधानाची बाब असल्याचे चित्र आहे. 
मुंबईतल्या सर्वच्या सर्व सहा लोकसभा मतदारसंघात मनसेचा मतदार असला तरी उत्तर मुंबई, उत्तर पुर्व, उत्तर पश्‍चिम व दक्षिण मुंबई मतदारसंघात मनसेचं उत्तम नेटवर्क आहे. या मतदारसंघात मनसेच्या कट्टर कार्यकर्त्यांची फळी असून स्थानिक प्रश्नांबाबत त्यांनी आंदोलन उभारत जनतेत जावून पक्षाची लढाऊ प्रतिमा कायम ठेवली आहे. 
मागील लोकसभा व विधानसभा निवडणूकांत मनसेनं नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत काही मोजक्‍या जागा लढवल्या. 2009 मधे मनसेनं सर्व मतदारसंघात सरासरी दिड लाखाच्या पुढे मते घेतली होती. तर 2014 च्या विधानसभेत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभेत 1,45000 हजाराहून अधिक मते घेतली.
उत्तर पुर्व लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभेत मनसेला 1,10,000 मते मिळाली. तर दक्षिण मुंबईतही लाखाच्या पुढे मते मिळाली. इतर लोकसभा मतदारसंघात मनसेचा 60 ते 70 हजार मतदारांचा गठ्ठा असल्याचे मानले जाते. 
उत्तर मुंबईत मनसेची ताकद मराठमोळ्या उर्मिला मातोंडकराच्या मागे उभी राहिली आहे. तर ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्यासोबत मनसे कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा यांच्यासाठीही मनसे कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार सुरू केल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजधानीतल्या सर्वच लढती रंगतदार बनल्या आहेत.

No comments:

Post a Comment